शहापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंमधील वादाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरही जोरदार राजकीय वारे वाहताना पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल केल्या जात आहे. त्यात काही पोस्ट आक्षेपार्ह आहेत. मात्र, शहापूर पोलिसांनी अशा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिलाय. शहापूर पोलिसांनी व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिन आणि सदस्यांना नोटीस बजावली आहे. (Shahapur Police issues notice to WhatsApp group admin and members)