AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकांचे कपडे घालण्याचा शौक, अंडरगार्मेंट्स चोरायचं, आत्याच्या नवऱ्याने पाहिलं अन्… बकाबका ओकताच पोलीस हादरले!

अहमदाबादमध्ये भाच्यानेच आत्याच्या नवऱ्याचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. महिलांचे अंडरगार्मेंट्स चोरताना पकडल्याने बदनामीच्या भीतीने त्याने हे कृत्य केले. आरोपीला बायकांचे कपडे घालण्याचा शौक होता आणि तो मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बायकांचे कपडे घालण्याचा शौक, अंडरगार्मेंट्स चोरायचं, आत्याच्या नवऱ्याने पाहिलं अन्... बकाबका ओकताच पोलीस हादरले!
Undergarment Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 14, 2026 | 6:38 PM
Share

अहमदाबादच्या शिलज परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाच्यानेच आत्याच्या नवऱ्याचा खून केल्याने उदयपूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अटकेनंतर पोलिसांनी या भाच्याची कसून चौकशी केली. त्यावेळी पोलिसांना धक्कादायक माहिती समजली. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी बकाबका ओकला. त्याने सर्व काही सांगून टाकलं. पण ते ऐकल्यानंतर पोलिस मात्र हादरूनच गेले. हत्येच्या दिवशी आत्याच्या नवऱ्याने भाच्याला त्यांच्या घरातून पैसे आणि महिलांचे अंडरगार्मेंट्स चोरताना रंगे हाथ पकडलं. आपली चोरी पकडल्या गेल्याने बदनामी होईल या भीतीने त्याने आत्याच्या नवऱ्याचा गळाच आवळून त्याला मारून टाकलं. धक्कादायक म्हणजे आरोपीला महिलांचे कपडे घालण्याचा शौक होता. त्याला एक प्रकारे मानसिक आजारच जडला होता, अशी धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

दोन महिन्यापूर्वी अहमदाबादच्या शिलज येथील अवनीश हाइट्समध्ये राहणारे मनीषभाई त्यांच्या फ्लॅटमध्येच मृतावस्थेत आढळले. मृतदेह दिसल्यानंतर मनीषभाईंच्या मुलाने पोलिसांना तात्काळ याची खबर दिली. बोपल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशीही सुरू केली. चौकशी दरम्यान मनीष भाई यांच्या मेव्हण्याचा मुलगा ब्रज सोनी गायब असल्याचं दिसून आलं. ब्रज हो गेल्या दहा दिवसांपासून घरीच असल्याचं समजलं. पोलिसांनी फ्लॅटचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यात ब्रज सोनी पहाटे पहाटेच पार्किंगमधून मनीषभाईंची कार घेऊन जाताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी मनिषभाई यांच्या घराची तपासणी केली. त्यात मनिषभाईंच्या घरातून पाच लाख रुपये चोरीला गेल्याचं आढळून आलं. पोलिसांनी मग चोरीचं प्रकरण नोंदवून त्या दिशेने तपास सुरू केला.

उदयपूरला पळाला

अहमदाबाद ग्रामीण पोलिस ठाण्याचे एसपी प्रकाश जाट यांनी या प्रकरणाची माहिती दिली. तपास करताना पोलिसांना आढळून आले की ब्रज सोनी हत्येनंतर मृतक व्यक्तीची कार घेऊन उदयपूरला गेला होता. त्यानंतर पोलिसांची एक टीम उदयपूरला गेली. पोलिसांनी ब्रजला अटक केलं. आरोपीकडून पोलिसांनी लुटलेल्या पैशांपैकी दोन लाख रुपये जप्त केले. तसेच त्याने चोरलेले महिलांचे अंडरगारमेंट्सही पोलिसांनी जप्त केले, असं एसपी प्रकाश जाट यांनी सांगितलं.

घरच्यांना माहीत होतं

आरोपीने चोरी करत असताना मनिष भाईला पाहिलं होतं. त्यामुळे त्याने आपली बदनामी होऊ नये म्हणून मनिष भाईची हत्या केली. मनिषभाईंची हत्या केल्यानंतर आत्याचे अंडरगार्मेंट्स घेऊन तो फरार झाला. आरोपीला महिलांचे कपडे घालण्याचा शौक होता. विशेष म्हणजे त्याच्या घरच्यांना ही गोष्ट माहीत होती. आरोपीने या पूर्वी मनिष भाईंच्या घरातील 25 हजार रुपये चोरले होते. त्यावेळी कुटुंबातील लोकांनी त्याला बेदम मारहाण केली होती. पण दुसऱ्यांदा मनिषभाईंच्या घरी चोरी करताना त्याने हत्याकांडच घडवून आणल्याने सर्वच सुन्न झाले आहेत.

Follow Us
2029 च्या निवडणुकीबाबत आत्ताच दिला थेट संकेत; पुण्यातील कार्यक्रमात...
पुढच्या वेळीही आम्हीच येणार, 2029 च्या निवडणुकीबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान काय?
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला भाजप
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंनी ऐकवला भाजप नेत्याचा ऑडिओ; एकच खळबळ!
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी...
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी गर्दी
सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
मोठी बातमी! सुप्रिया सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे...
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे फक्त एक पद...
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंचे आमदार
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंच्या आमदाराची हजेरी, चर्चांना उधाण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा....
Viral Video | धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी....
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी शिवसैनिकांमध्ये बाचाबाची
Maharashtra Weather Update : राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, 24 तासात...

Maharashtra Weather Update : राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, 24 तासात..

डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे आदेश, जगात खळबळ, थेट इराण युद्धात अमेरिकेचे 2 सैनिक ठार तर...

डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे आदेश, जगात खळबळ, थेट इराण युद्धात अमेरिकेचे 2 सैनिक ठार तर..

इमरान खान यांच्या बहिणीचे मोठे विधान, भारतामुळे पाकिस्तान थेट… नेमकं काय म्हणाल्या?.

इमरान खान यांच्या बहिणीचे मोठे विधान, भारतामुळे पाकिस्तान थेट… नेमकं काय म्हणाल्या?

Horoscope Today 19th July 2026 : आज कोणत्या राशीवर असेल नशिबाची कृपा?  मेष ते मीन, वाचा सविस्तर भविष्य.

Horoscope Today 19th July 2026 : आज कोणत्या राशीवर असेल नशिबाची कृपा? मेष ते मीन, वाचा सविस्तर भविष्य

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी….

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी…

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित.

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित