AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इकडे घरात सत्यनारायणाची पूजा अन् तिकडे दगडाने ठेचून मारले… विरारचा आका कोण? अख्खा पालघर जिल्हा हादरला

Virar Crime : विरारमध्ये मंगळवारी भरदिवसा आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आता या घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

इकडे घरात सत्यनारायणाची पूजा अन् तिकडे दगडाने ठेचून मारले... विरारचा आका कोण? अख्खा पालघर जिल्हा हादरला
Virar CrimeImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 13, 2026 | 5:24 PM
Share

पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये मंगळवारी धक्कादायक घटना घडली आहे. भरदिवसा एका आरटीआय (RTI) कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिरगाव परिसरात ही थरारक घटना घडली, यात आत्माराम पाटील यांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी आत्माराम पाटील हे वसई तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासोबत एका शासकीय कामासाठी शिरगाव येथील खदान परिसरात गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना ठार करण्यात आले. आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

कुटुंबियांचा गंभीर आरोप

आत्माराम पाटील यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांनी मोठा आरोप केला आहे. आरोपी भालचंद्र पाटील आणि महेश पाटील यांचा अनधिकृत बंगला, खादान, बेकायदेशीर जमिनी हडप केल्याच्या विरोधात तक्रारी केल्याचा राग मनात धरून, मंडळाधिकारी प्रभाकर पाटील यांच्या समोर आत्माराम पाटील यांची अक्षरश: दगडाने ठेचून हत्या केल्याचे कुटुंबियांनी म्हटले आहे.

कशी घडली घटना?

शिरगाव येथील खदानीबाबत अमित चौधरी यांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर तहसीलदार यांच्या आदेशावरून मंडलाधिकारी प्रभाकर पाटील पाहणी करण्यासाठी गेले होते. या तक्रारदाराच्या सांगण्यावरून मयत आत्माराम पाटील तेथील परिस्थिती दाखवायला गेले असता आरोपींनी रागाच्या भरात त्यांची हत्या केली आहे. 10 ते 12 जणांनी ही हत्या केली असून, 2 जणांना ताब्यात घेतले आहे तर अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आली आहेत.

घरात सत्यनारायणाची पूजा अन्…

आत्माराम पाटील यांच्या भावाच्या मुलाचे दोन दिवसापूर्वी लग्न झाल्याने मंगळवारी त्यांच्या घरात सत्यनारायणाची पूजा होती. एकीकडे लग्नाचा आनंद घरात होता, दुसरीकडे घरात दुपारी 12 वाजता सत्यनारायणाची पूजा सुरू होती त्याच वेळेत आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून आत्महत्या केली आहे. आत्माराम पाटील हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी भालचंद्र पाटील हा विरार पूर्व कडील मोठा आका असून अनेक कुटुंबियांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या असल्याचा आरोप ही करण्यात आला आहे. त्यामुळे विरारच्या अक्का वर कडक कारवाही करावी अशी मागणी आत्माराम पाटील यांच्या कुटुंबियांनी केली आहे.

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत