AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंधाऱ्या खोलीत 12 पीर बाबा, म्हणाले ‘व्हर्जिनिटी टेस्ट करावं लागेल’; शूटिंग कोच मोहसिनने तरुणीसोबत काय केलं?”

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले आहेत.

अंधाऱ्या खोलीत 12 पीर बाबा, म्हणाले 'व्हर्जिनिटी टेस्ट करावं लागेल'; शूटिंग कोच मोहसिनने तरुणीसोबत काय केलं?
CrimeImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Jun 01, 2025 | 4:28 PM
Share

मध्य प्रदेशमधील इंदौर येथे धक्कादायक घटना घडली आहे. तिथे खूप अंधार होता. त्याने मला एका खोलीत नेलं. दार उघडलं तेव्हा आत 12 पीर बाबा बसलेले दिसले. ते मला म्हणाले, “तुला तुझं व्हर्जिनिटी टेस्ट करावं लागेल…” असा खुलासा एका तरुणीने केला होता. तिने पोलिसांनी हा माहिती देताच इंदौरमध्ये शूटिंग कोच मोहसिन खानविरुद्ध सातवा FIR दाखल करण्यात आला आहे.

अन्नपूर्णा पोलीस ठाण्याने मोहसिन खानविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. आता एकूण सात गुन्हे मोहसिनविरुद्ध नोंदवले गेले आहेत. यावेळी ज्या तरुणीने मोहसिनविरुद्ध तक्रार दाखल केली, तिचे आरोप अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहेत. तरुणीच्या म्हणण्यानुसार, मोहसिनने शूटिंग रेंज उघडण्याच्या आणि बंदूक मिळवून देण्याच्या नावाखाली तिच्याकडून लाखो रुपये उकळले. त्यानंतर पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली एका महिलेसह आणि डझनभर पीर बाबांसह तंत्रक्रिया करवली. तरुणाशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला आणि नकार दिल्यावर जीवे मारण्याची धमकी दिली.

वाचा: ठाण्यातील देशद्रोही रवी वर्माने 14 पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती पाकला कशी पाठवली?

पीडित तरुणीने सांगितलं की, ती ड्रीम ओलंपिकमध्ये नोकरीसाठी एका जाहिरातीच्या माध्यमातून गेली होती. मोहसिनने तिच्या कामाचं कौतुक करत सांगितलं, “तू शूटिंग शिक. मी तुला शूटिंग रेंज उघडायला मदत करेन.” यासाठी त्याने लाखो रुपये घेतले. पुढे त्याने सांगितलं की, रेंज उघडण्यासाठी आणखी पैशांची गरज आहे. मोहसिनने साधना जोहरी नावाच्या महिलेशी ओळख करून दिली आणि सांगितलं, “देवदुताला खुश करण्यासाठी तुला बुधवारी नवरीसारखं सजून यावं लागेल. देवदूत प्रसन्न झाला तर तुझ्यावर पैशांचा पाऊस पडेल.” साधनाने असा एक व्हिडिओ दाखवला, ज्यामध्ये बेडवर खूप नोटा पडलेली दिसत होती. मोहसिन तिला हवा बंगला येथील एका फार्महाऊसवर घेऊन गेला.

“ध्यान लाव, जिन्न मेहरबान होणार आहे”

पीडितेने सांगितलं, “साधनाने इत्र लावून सांगितलं की, तुला व्हर्जिनिटी टेस्ट करावं लागेल. मी खोलीत गेले तेव्हा तिथे 10 ते 12 पीर बाबा होते. एकाने एक औषधी वनस्पती जाळून सांगितलं, ‘ध्यान लाव, देवदुत मेहरबान होणार आहे.’ माझं ध्यान एकत्रित झालं नाही, तेव्हा पीर बाबांनी मोहसिन आणि साधना जोहरीला सांगितलं की, ही मुलगी आपल्या कामाची नाही. हिला परत घेऊन जा, नाहीतर देवदुत नाराज होईल आणि आपण उद्ध्वस्त होऊ.”

“सगळं विसर आणि फैजानशी संबंध ठेव”

तरुणीने पुढे सांगितलं, “तंत्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी मोहसिनने मला सांगितलं की, या कामात माझे 20 लाख रुपये वाया गेले. तुझ्यामुळे पैशांचा पाऊस पडला नाही. त्याने मला फैजान खानशी ओळख करून दिली आणि सांगितलं, जे झालं ते विसर आणि शूटिंग अकादमी उघडण्यासाठी पुढे तयारी कर. मोहसिन म्हणाला की, फैजानशी संबंध ठेव. मी नोकरी सोडून थेट पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा विचार केला होता, पण मोहसिनच्या लोकांनी मला धमकावलं. पण जेव्हा मोहसिनचे कारनामे उघड झाले आणि मला त्याची माहिती मिळाली, तेव्हा मी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.”

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.