श्रींजयची लोक मालिश करत होते… मुलाच्या गूढ मृत्यूचं आईनेच उघडलं रहस्य
पश्चिम बंगालचे भाजपचे माजी अध्यक्ष दिलीप घोष यांच्या सावत्र मुलाचा, श्रींजय दासगुप्ताचा, रहस्यमय मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह न्यूटाऊन येथे सापडला. घोष यांनी नुकतेच दुसरे लग्न केले होते आणि श्रींजय यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईच्या नवीन लग्नाशी त्याचा संबंध असल्याचे बोलले जात आहे.

पश्चिम बंगालचे भाजपचे माजी अध्यक्ष दिलीप घोष यांचा सावत्र मुलगा श्रींजय दासगुप्ता ऊर्फ प्रीम यांचा मंगळवारी रहस्यमय मृत्यू झाला. दिलीप घोष यांची दुसरी पत्नी रिंकू मजूमदार यांच्या पहिल्या नवऱ्याचा तो मुलगा होता. न्यूटाऊन येथील सापुर्जी हौसिंग कॉम्प्लेक्समध्ये त्यांचा मृतदेह सापडला. दिलीप घोष यांनी 26 दिवसांपूर्वीच 47 वर्षीय रिंकू यांच्यासोबत विवाह केला होता. श्रींजय यांच्या मृत्यूमुळे ते त्यांच्या आईच्या दुसऱ्या लग्नामुळे त्रस्त होते का? असा सवाल केला जात आहे. मात्र, आईच्या दुसऱ्या लग्नाची काहीच अडचण नसून मी खूश आहे, असं श्रींजय यांनी सांगितलं होतं.
आता या प्रकरणात आणखी एक गोष्ट समोर आली आहे. श्रींजय यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी त्यांच्या फ्लॅटवर ऑफिसचे दोन लोक आले होते. याशिवाय श्रींजयची गर्लफ्रेंडही त्या रात्री फ्लॅटवर आली होती. श्रींजयच्या आईनेच हा दावा केला आहे.
दोघे मालिश करत होते…
श्रींजयच्या आईने म्हणजे रिंकू यांनी अजूनही काही दावे केले आहेत. श्रींजय यांचा एक सहकारी रात्री 10 वाजता आलो होता. दुसरा पहाटे 3 वाजता आळा होता. जेव्हा मला या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा मी जाऊन पाहिलं. तेव्हा श्रींजय पहुडलेला होता. आणि बाजूच्या फ्लॅटमधील एक महिला आणि एक मुलगा त्याची मालिश करत होते. श्रींजयने रात्री 12 वाजता मला शेवटचा फोन केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सायन्स सिटीला जाण्याबाबत तो बोलत होता. तसेच उद्याच दुर्गा पूजेला जाणार असल्याचंही तो म्हणत होता, असं रिंकू म्हणाल्या.
आजाराने पीडित
कुटुंबाच्या माहितीनुसार, श्रींजय यांना आजार होते. त्यांना सातत्याने औषधे घ्यावी लागत होती. पण गेल्या काही दिवसापासून तो औषधे वेळेत घेत नव्हता. दीड वर्षापूर्वी तो अचानक बेशुद्ध पडला होता. त्याला न्यूरोची औषधे दिली जात होती. काही दिवसापासून तो औषधे वेळेवर घेत नव्हता. काहीही बोलत नव्हता.
श्रींजय यांच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंबीय दु:खात आहेत. रिंकू यांचा तो एकूलता एक मुलगा होता. दिलीप घोष यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दुर्देवाने मला मुलाचं सुख मिळालं नाही, असं दिलीप घोष म्हणाले. तर, श्रींजयला आईच्या दुसऱ्या विवाहाची काहीच अडचण नव्हती, असं त्याच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.