रात्री फ्लॅटवर आली गर्लफ्रेंड… सकाळी त्याचा मृतदेह सापडला; भाजप नेत्याच्या मृत्यूचं गूढ वाढलं
कोलकातातील भाजप नेते दिलीप घोष यांच्या सावत्र मुलाचा श्रींजय दासगुप्ताचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह त्यांच्याच फ्लॅटमध्ये आढळला. पोलिसांनी त्यांच्या मित्रांची आणि प्रेयसीची चौकशी केली आहे. श्रींजयला न्यूरो प्रॉब्लेम होता, पण मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही. मृत्यूपूर्वी श्रींजय आपल्या मित्रांसह होता आणि दुर्गापूरला जाण्याची योजना होती.

कोलकातातील भाजपचे नेते दिलीप घोष यांचा सावत्र मुलगा श्रींजय दासगुप्ता ऊर्फ प्रीतम मजूमदार यांचा मृत्यू झाला आहे. पण संदिग्ध स्थितीत त्यांचा मृतदेह सापडल्याने चर्चांना उधाण आलं आहे. आता श्रींजय यांच्या मृत्यूबाबतचं एक गूढ समोर आलं आहे. कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रींजय सोमवारी रात्री मित्रांसोबत आला होता. त्याच्या ऑफिसमधीलच हे दोन्ही दोस्त होते. त्यात एक महिलाही होती. ही महिला श्रींजयची प्रेयसी असल्याचं सांगितलं जात आहे. हा अँगल समोर आल्यानंतर पोलिसांनी श्रींजयच्या प्रेयसीचीही चौकशी सुरू केली आहे. मात्र, या प्रकरणात पोलीस अद्याप काहीही ठोस माहिती देताना दिसत नाहीये.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रींजयकडे रात्री दोन लोक आले होते. एक व्यक्ती रात्री 11 वाजता आला होता. तर दुसरा पहाटे 3 वाजता आला होता. त्यांना मंगळवारी सकाळी 8 वाजता दुर्गापूरसाठी जायचं होतं. पण सकाळी श्रींजय अचेतन अवस्थेत आढळून आले. श्रींजयची ही हालत पाहून त्यांच्या मित्रांनी तात्काळ श्रींजयच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तपासून श्रींजय यांना मृत घोषित करण्यात आलं. श्रींजय यांना आधीपासूनच न्यूरो प्रॉब्लेम होता. त्यांचा उपचारही सुरू होता.
मृत्यूचं रहस्य वाढलं
सध्या श्रींजय यांच्या मृत्यूचं रहस्य अधिकच वाढलं आहे. त्याचं कुटुंबही ही घटना सामान्य नसल्याची सांगत आहेत. कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रींजय यांना दिलीप घोष यांची पत्नी रिंकू मजूमदार यांचा मुलगा मंगळवारी सकाळी दुर्गापूरला घेऊन जाणार होता. सोमवारी रात्री 11 वाजता त्याने त्याच्या काकासोबत चर्चाही केली होती. या टूरसाठी त्याने ऑफिसमधून दोन दिवसाची सुट्टीही घेतली होती. पण सकाळी त्यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
दिलीप घोष यांचा सावत्र मुलगा
श्रींजय हे भाजपचे नेते दिलीप घोष यांचे सावत्र मुलगा आहे. दिलीप घोष यांची पत्नी रिंकू यांची दोन लग्न झालेली आहेत. श्रींजयचा जन्म तिच्या पहिल्या लग्नातून झालेला आहे. सध्या श्रींजय न्यू टाऊन येथील एका फ्लॅटमध्ये राहायचे. त्याच फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह मिळाला. पोलिसांच्या मते, श्रींजय यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालेलं नाही. मृत्यूचं कारण पोस्टमार्टम नंतरच कळणार आहे.