Shrikant Tyagi Case : घाणघाण शिव्या देत महिलेशी भांडणारा श्रीकांत त्यागी अखेर गजाआड! मदत करणाऱ्या इतर तिघांनाही बेड्या

बेकायदेशीर बांधकावरुन जाब विचारणाऱ्या या महिलेसोबतचं श्रीकांत त्यागीने केलेलं भांडण सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्याच्याविरोधात संताप व्यक्त केला जात होता.

Shrikant Tyagi Case : घाणघाण शिव्या देत महिलेशी भांडणारा श्रीकांत त्यागी अखेर गजाआड! मदत करणाऱ्या इतर तिघांनाही बेड्या
श्रीकांत त्यागीImage Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 1:27 PM

नोएडात गेल्या चार दिवसांपासून ज्या श्रीकांत त्यागीचा (Shrikant Tyagi Case) शोध सुरु होता, त्याला अखेर अटक करण्यात आली आहे. तसंच त्याच्यचासोबत इतर तिघांनाही अटक करण्यात आली आहे. नोएडा पोलीस आणि एसटीएफ श्रीकांत त्यागीला अटक (Shrikant Tyagi Arrested) करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून छापेमारी करत होती. 8 पथकं श्रीकांत त्यागीच्या मागावर होती. तीन राज्यात त्याचा शोध घेतला जात होता. अखेर त्याला अटक करण्यात आली असून आता त्याची कसून चौकशी केली जातेय. मेरठच्या कंकरखेडामधून श्रीकांत त्यागीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. श्रीकांत त्यागी याचा एक व्हिडीओ व्हायरल (Shrikant Tyagi Video) झाला होता. या व्हिडीओमध्ये श्रीकांत त्यागी हा महिलेला अर्वाच्च भाषेत शिविगाळ करताना दिसला होता. बेकायदेशीर बांधकावरुन जाब विचारणाऱ्या या महिलेसोबतचं श्रीकांत त्यागीने केलेलं भांडण सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्याच्याविरोधात संताप व्यक्त केला जात होता. दरम्यानच्या काळात ज्या बेकायदेशीर बांधकामावरुन भांडण झालं होतं, त्यावरही हातोडा टाकत कारवाई करण्यात आली होती.

25 हजार रुपयांचं होतं बक्षीस

श्रीकांत त्यागी हा स्वतःला एका राजकीय पक्षाचा नेता असल्याचं सांगत होता. काही रिपोर्ट्सनुसार, तो भाजपशी संबंधित असल्याचंही सांगण्यात आलंय. दरम्यान, व्हायरल व्हिडीओनंतर कारवाई साठी त्याचा शोध घेतला जात होता. तो गेल्या फरार असल्यानं पोलिसांनी पथकंही त्याच्या शोधासाठी तैनात केली होती. तोपर्यंत पोलिसांनी दोन वेळी श्रीकांत त्यागी यांच्या बायकोलाही ताब्यात घेत तिचीही चौकशी केली होती. त्यागीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याचा पत्ता सांगणाऱ्या 25 हजार रुपयांचं बक्षिसही जाहीर केलं होतं. इतकंच काय तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संपूर्ण प्रकरणी गृहविभागाला चौकशीचे निर्देशही दिले होते. अखेर चार दिवसांची श्रीकांत त्यागीच्या मुसक्या आवळण्यात यश आलंय.

त्यागीला पोलीस संरक्षण?

श्रीकांत त्यागी याला पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं. श्रीकांत त्यागी याला कोणत्या अधिकाऱ्यांनी पोलीस संरक्षण देण्याची परवानगी दिली आणि त्यामागचे निकष काय होते, याचाही रिपोर्टही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मागवलाय. त्यागीला पोलीस संरक्षणाची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवरील दोषाची पडताळणी करुन त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.

काय आहे प्रकरण?

नोएडा सेक्टर 93च्या ओमॅक्स सोसायटीत श्रीकांत त्यागी याने एका महिलेसोबत अत्यंत खालच्या भाषेत बोलत तिला धमकावलं होतं. सर्वांच्या देखत या महिलेला घाणघाण शिव्या देत तिला इशारा देणाऱ्या श्रीकांत त्यागीता व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओ महिलेनं विचारलेल्या बेकायदेशीर बांधकामाच्या प्रश्नांना उत्तरं देताना श्रीकांत त्यागी हमरीतुमरीवर उतरला होता. त्यानंतर करण्यात आलेली शिविगाळ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर अखेर श्रीकांत त्यागीने केलेल्या अवैध बांधकामावरही हातोडा पाडण्यात आला होता. तसंच अखेर आता त्याला अटकही करण्यात आलीय.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.