जयपूरमध्ये सख्ख्या दिराकडून वहिनीवर वारंवार बलात्कार, आरोपीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल

आरोपी मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत घरी यायचा आणि वहिनीवर बलात्कार करायचा. त्याने पीडितेवर 3-4 वेळा बलात्कार केला. आरोपींच्या कृत्यामुळे व्यथित झालेल्या पीडितेने तिच्या पतीला सांगितले आणि पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली.

जयपूरमध्ये सख्ख्या दिराकडून वहिनीवर वारंवार बलात्कार, आरोपीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल
जयपूरमध्ये सख्या वहिनीवर दिराकडून वारंवार बलात्कार

जयपूर : जयपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील बागरू पोलीस स्टेशन परिसरात नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे. सख्या दिरानेच महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. याबाबत कुठेही वाच्छता केल्यास तुला व तुझ्या पतीला जीवे मारेन अशी धमकी आरोपी पीडितेला देत होता. पीडिता भीतीपोटी सर्व काही सहन करीत होती. शेवटी सहन न झाल्याने तिचा संयम सुटला आणि तिने तिच्या नवऱ्याला याबाबत सांगितले. यानंतर पती-पत्नी दोघांनीही पोलिसांकडे धाव घेत घडल्या प्रकाराबाबत सांगितले. पीडितेच्या अहवालावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. (Sister in law was raped several times by brother in law in jaipur)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने तिच्या अहवालात सांगितले की, ती तिच्या सासरच्या लोकांसोबत बगरू येथे भाड्याच्या घरात राहते आणि लाकडाच्या कारखान्यात मजूर म्हणून काम करते. सुमारे दीड महिन्यापूर्वी तिचा दिर तिच्या खोलीत आला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेबाबत कुणाला सांगितल्यास तिला व तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली होती. यामुळे पीडिता घाबरली आणि शांत राहिली. यानंतर आरोपी मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत घरी यायचा आणि वहिनीवर बलात्कार करायचा. त्याने पीडितेवर 3-4 वेळा बलात्कार केला. आरोपींच्या कृत्यामुळे व्यथित झालेल्या पीडितेने तिच्या पतीला सांगितले आणि पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली.

चुरूमध्ये तरुणाने मित्रांसह बहिणीवर केला सामूहिक बलात्कार

अलीकडेच चुरू जिल्ह्यात देखील नातेसंबंधाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. तेथे एका तरुणाने एका विवाहित महिलेशी मैत्री करून तिला आपली बहिण बनवले. नंतर रक्षाबंधनाला तिच्याकडून राखीही बांधून घेतली. त्यानंतर एक दिवस आरोपी त्याच्या मित्रांसह महिलेच्या सासरी गेला आणि घरी जाण्याचा हट्ट करु लागला. पीडित त्याच्या बोलण्यात आली. तो तरुण आणि त्याच्या मित्रांनी पीडितेचे अपहरण करून तिला कळवड येथे नेले. येथे त्याने महिलेवर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी याचा व्हिडिओ बनवला आणि अश्लील फोटोही काढले. त्यानंतर व्हिडिओ आणि फोटोंच्या आधारे तिला ब्लॅकमेल करीत तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला.

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीला तेलंगणातून अटक

लग्नाचे आमिष दाखून 21 वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीच्या वसई लोहमार्ग पोलिसांनी तेलंगणातून मुसक्या आवळल्या आहेत. शेष प्रसाद ऊर्फ दिपू हिरालाल पांडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे. पीडित तरुणीने आरोपीविरुद्ध 26 जुलै 2021 रोजी लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपी फरार झाला होता.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा मोबाईल फोन ट्रेस केला. मोबाईल लोकेशननुसार आरोपी तेलंगणा राज्यात असल्याची माहिती पोलिसांना कळली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी तेलंगणातून आरोपीची गठडी वळली. सदर आरोपी वसई येथे रेल्वेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर स्टँड बॉय म्हणून कामाला होता. त्यावेळी आरोपीने हे दुष्कृत्य केले असल्याचे पोलीस तपासाच समोर आले. वसई लोहमार्ग पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 323, 376(2)(एन), 354,अ(1)(3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने याआधी देखील असे कृत्य केले आहे का? याचा सखोल तपास वसई लोहमार्ग पोलीस करत आहेत. (Sister in law was raped several times by brother in law in jaipur)

इतर बातम्या

मोदीजी, अरिजीतच्या आवाजातील गाण्याची निर्मिती, हीच अखेरची इच्छा, 16 वर्षीय तरुणाची सुसाईड नोट

साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनाला निघालेल्या साताऱ्याच्या महिला बाईक रायडरला अपघात, टँकर डोक्यावरुन गेल्याने मृत्यू

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI