कपाटात नोटांची थप्पी, खचाखच भरलेलं नोटांचं कपाट नेमकं कुणाचं?

आयकर विभागाने हैदराबादमध्ये टाकलेल्या धाडीनंतर, सोशल मीडियावर कपाटात खचाखच भरलेल्या नोटांचा फोटो व्हायरल झाला. नुकतंच आयकर विभागाने हेटेरो फार्मास्युटिकल (Hetero Pharma) ग्रुपवर छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले.

कपाटात नोटांची थप्पी, खचाखच भरलेलं नोटांचं कपाट नेमकं कुणाचं?
IT Raids Hyderabad
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 1:45 PM

Income Tax Raid Hyderabad : आयकर विभागाने हैदराबादमध्ये टाकलेल्या धाडीनंतर, सोशल मीडियावर कपाटात खचाखच भरलेल्या नोटांचा फोटो व्हायरल झाला. नुकतंच आयकर विभागाने हेटेरो फार्मास्युटिकल (Hetero Pharma) ग्रुपवर छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले. कारण, हेटेरो फार्मास्टुटिकलच्या कार्यालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना एका कपाटात तब्बल 142 कोटी रुपये सापडले आहेत. तब्बल 142 कोटी रुपये रोख रक्कम सापडल्याने चक्रावून जाणं साहजिक आहे. त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

नेमकं प्रकरण काय?

आयकर विभागाने हैदराबादेतील हेटेरो फार्मास्युटिकल (Hetero Pharma) या कंपनीवर धाड टाकली. आयकर विभाग 550 कोटी रुपयांच्या बेहिशेबी संपत्तीची चौकशी करत आहे. याच चौकशीदरम्यान आयकर विभागाला तब्बल 142 कोटी रुपयांची रोकड सापडली. कपाटात नोटांचा खच किंवा खचाखच भरलेल्या नोटा असा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. आयकर विभागाने हेटेरो फार्मास्युटिकल (Hetero Pharma IT Raid) कंपनीच्या 6 राज्यातील जवळपास 50 ठिकाणांवर छापेमारी केली.

IT raid Hetero Pharmaceutical

IT raid Hetero Pharmaceutical

कंपनीचा नेमका ‘उद्योग’ काय?

CBDT च्या म्हणण्यानुसार, हेटरो ग्रुप हा औषध निर्मिती, उत्पादन आणि विक्री उद्योगात आहे. त्याची बहुतेक उत्पादने अमेरिका आणि दुबईसारख्या देशांमध्ये आणि काही आफ्रिकन आणि युरोपियन देशांमध्ये निर्यात केली जातात.

हेटेरो समूह कोविड -19 च्या उपचारासाठी वापरण्यात आलेल्या रेमडेसिविर (Remdesivir) आणि फेविपीरावीरसारख्या (Favipiravir) विविध औषधांच्या निर्मितीच्या निमित्ताने प्रकाशझोतात आला होता. या कंपनीची भारत, चीन, रशिया, इजिप्त, मेक्सिको आणि इराणमध्ये 25 हून अधिक ठिकाणी उत्पादन सुविधा आहेत. या फार्मा कंपनीची उलाढाल जवळपास 7500 कोटी रुपये इतकी आहे. या कंपनीने COVID-19 व्हॅक्सिन Sputnik V च्या निर्मितीसाठी रशियासोबत करार केला होता.

पैशाने भरलेल्या कपाटाचा फोटो

या कारवाईदरम्यान कपाटात भरलेल्या पैशाचा फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला. दरवाजे उघडे असलेल्या कपाटात नोटांची थप्पी लागल्याचं या फोटोत (Cash Photo Viral) दिसत होतं. या थप्पीवरुन रक्कम किती असू शकते याचा अंदाज येऊ शकतो.

संबंधित बातम्या  

अलमारीत सापडले तब्बल 142 कोटी रुपये! आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.