AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई-बाबा त्याच्यावर जास्त प्रेम करायचे म्हणून… बहिणीने भावासोबत असं काही केलं की… ‘त्या’ धक्क्यातून सावरणं कठिण…

Crime News : खुनाच्या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस पोहोचले असता, संपूर्ण प्रकरण समजल्यानंतर तेही चक्रावून गेले. ज्यावेळी आरोपी बहिणीने हे कृत्य केले, त्यावेळी घरात फक्त ती आणि तिचा लहान भाऊ होता.

आई-बाबा त्याच्यावर जास्त प्रेम करायचे म्हणून... बहिणीने भावासोबत असं काही केलं की... 'त्या' धक्क्यातून सावरणं कठिण...
घटस्फोट घेतल्याच्या रागातून पतीने पत्नीला संपवले
| Updated on: Jun 01, 2023 | 3:36 PM
Share

फरीदाबाद : जर तुमच्या घरात दोन मुलं असतील आणि तुम्ही त्यांच्यात कोणत्याही प्रकारची तुलना करत असाल किंवा कधी कधी एका मुलावर जास्त प्रेम करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. ही बातमी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल कारण वल्लभगढमध्ये एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने (Girl killed brother) आपल्या 12 वर्षाच्या नावाच्या निष्पाप भावाची हत्या केली. आई-वडील तिच्यावर भावापेक्षा जास्त प्रेम करतात, या द्वेषातून तिने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

मंगळवारी सायंकाळी उशिरा वल्लभगडमध्ये एका 12 वर्षांच्या मुलाचा घरातच गळा आवळून खून करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली. मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार ती आणि तिचा नवरा दोघेही नोकरी करतात. मंगळवारी सायंकाळी उशिरा ते कामावरून परत आले असता त्यांना त्यांचा मुलगा चादर ओढून झोपलेला दिसला. आधी मुलाला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो उठला नाही म्हणून त्यांनी त्याच्या अंगावरची चादर काढली असता त्यांना धक्काच बसला. मुलाच्या आईच्या म्हणण्यानुसार, मुलाचा गळा दाबून खून करण्यात आला, त्यावेळी घरात फक्त तो मुलगा आणि त्याची मोठी बहीण हजर होती.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांना पहिला संशय 15 वर्षांच्या मृत मुलाच्या बहिणीवर गेला. आणि पोलिसांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत चौकशी सुरू केली तेव्हा हत्येमागचे कारण समोर आले, ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. अल्पवयीन मुलीने सांगितले की ती आणि तिचा भाऊ उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या आजी-आजोबांसोबत राहत आणि शिकत होते, उन्हाळ्याच्या सुट्टीच्या काही दिवस आधी ते त्यांच्या पालकांसह वल्लभगडला पोहोचले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला असे वाटत होते की तिचे पालक तिच्यापेक्षा आपल्या भावावर जास्त प्रेम करतात. मुलाच्या नातेवाईकांनी त्याला मोबाईल दिला होता. मंगळवारी तिचा भाऊ गेम खेळत असताना मुलीने मोबाईल मागितला. भावाने देण्यास नकार दिल्याने त्याने रागाच्या भरात त्याचा गळा दाबून खून केला. सध्या पोलीस या मुलीला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्याची तयारी करत आहेत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.