AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात SIT चा छापा, अनेक शिक्षकांचे आयडी बोगस आढळले

शांती निकेतन शैक्षणिक संस्थेचे संस्थाचालक असलेले ओंकार भाऊराव अंजीकर यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या कसून चौकशी केली जात आहे. एसआयटीच्या छाप्यात काही शिक्षकांचे शालार्थ आयडी बोगस आढळले आहेत.

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात  SIT चा छापा, अनेक शिक्षकांचे आयडी बोगस आढळले
crime news
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 26, 2025 | 7:59 AM
Share

राज्यात गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) ने छापे टाकले आहेत. या छाप्यामध्ये एसआयटीला मोठे यश मिळाले आहे. नागपूर येथील शिक्षण संस्था संचालक ओंकार भाऊराव अंजीकर यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या तीन शाळांवर एसआयटीने छापे टाकले. या छाप्यांमध्ये काही शिक्षकांचे शालार्थ आयडी बोगस आढळले आहे. २०१९ पासून अंजीकर यांनी साधारण ३० शिक्षकांचे बनावट शालार्थ आयडी तयार केल्याचा आरोप आहे.

एसआयटीकडून कागदपत्रे जप्त

शांती निकेतन शैक्षणिक संस्थेचे संस्थाचालक असलेले ओंकार भाऊराव अंजीकर यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या शांती निकेतन शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत जय हिंद उच्च प्राथमिक विद्यालय चालवले जाते. एसआयटीने गुलशन नगर येथील जय हिंद विद्यालय येथे छापा टाकून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. तपासणी दरम्यान काही शिक्षकांचे शालार्थ आयडी बोगस असल्याचे आढळून आले.

एसआयटीच्या छाप्यानंतर शांतीनिकेतन शैक्षणिक संस्थेचे संस्थाचालक ओंकार भाऊराव अंजीकरचे पाय आणखी खोलात असल्याचे समोर आले आहे. अंजीकर यांनी त्यांच्या संस्थेचे बनावट लेटरहेड वापरुन अपात्र मुख्याध्यापक पराग पुडके यांना पद मिळवल्याची तक्रार केली होती. परंतु आता ते स्वत: एसआयटीच्या चौकशीत अडकले आहेत. अंजीकर यांच्या संस्थेमार्फत तीन शाळा चालवल्या जातात.

अनेक जण अडकणार

राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात गाजलेल्या बोगस शालार्थ आयडी प्रकरणामध्ये पोलिसांकडून अपात्र संस्थाचालकांवर अटकेची कारवाई सुरू झाली आहे. तसेच या प्रकरणात शिक्षण विभागातील तत्कालीन कर्मचारी अडकणार आहेत. त्यात शिक्षणाधिकारी, क्लार्क, वेतन अधीक्षक यांच्यासह इतर काही जणांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भात नियमाप्रमाणे प्रक्रिया न करताच शालार्थ आयडी दिले. त्यामुळे 650 शिक्षकांच्या नियुक्त्या बोगस असण्याची दाट शक्यता पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी व्यक्त केली.

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?