AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Accident | सोलापुरात भीषण अपघात, 35 प्रवासी घेऊन जाणारी बस अचानक पलटली

ऊसाचे ट्रॅक्टर रस्त्याच्या मधोमध जात असल्याने एसटी ओव्हरटेक करताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात गेली..

Accident | सोलापुरात भीषण अपघात, 35 प्रवासी घेऊन जाणारी बस अचानक पलटली
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 05, 2023 | 12:05 PM
Share

सागर सुरवसे, सोलापूर | सोलापूर जिल्ह्यात एक भीषण अपघाताची (Bus Accident) घटना घडली आहे. 35  प्रवासी घेऊन जाणारी बस अचानक पलटी झाली. या अपघातावेळी बसचा वेग कमी होता. मात्र रस्त्यात आलेल्या ऊसाच्या ट्रकला (Sugarcane truck) ओव्हरटेक (Overtake) करण्याच्या प्रयत्नात बस रस्त्यावरून खालील बाजूला पलटी झाली. यामुळे अनेक प्रवाशांना दुखापत झाली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Bus Accident

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात ही घटना घडली. सुर्डी मालनंजी गावाजवळ असा बसला अपघात झाला. अपघातानंतर बस पूर्णपणे पलटी झाली. त्यामुळे प्रवाशांच्या जीवावर बेतण्यासारखी स्थिती होती.

Bus Accident

कुर्डुवाडी येथून वैरागच्या दिशेने ही बस निघाली होती. प्रत्यक्ष दर्शींनी सांगितल्या प्रमाणे बस वेगात नव्हती, मात्र ऊसाच्या ट्रकच्या पुढे जाताना चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला.

ऊसाचे ट्रॅक्टर रस्त्याच्या मधोमध जात असल्याने एसटी ओव्हरटेक करताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात गेली..

Bus Accident

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र लहान मुले आणि महिला किरकोळ जखमी झाले आहेत.

Bus

दरम्यान ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली आली. यावेळी रस्त्यावरील वीजेच्या खांबाला धडक झाल्याने दोन खांब रस्त्यावर पडले.

भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.