पत्नीला मारण्यासाठी नवऱ्याने दिली 10 लाखाची सुपारी; बायकोच्या जागी त्याचाच मिळाला मृतदेह…

बायकोला मारण्यासाठी एकाने शूटर्सला दहा लाखाची सुपारी दिली होती, त्यातून बायको वाचली तरीही पैसे देण्याचा वादाही त्याने केला होता. कारण त्याला पत्नीला कोणत्याही परिस्थिती संपवायचेच होते. म्हणून शूटर्सने त्याच्या पत्नीवर हल्लाही केला, हल्ला झाला त्यावेळी महिलेबरोबर तिची मुलगीही बरोबर होती. शूटर्सने एका पाठोपाठ एक अशा चार गोळ्या महिलेवर झाडल्या, तरीही त्यातून ती महिला वाचली पण...

पत्नीला मारण्यासाठी नवऱ्याने दिली 10 लाखाची सुपारी; बायकोच्या जागी त्याचाच मिळाला मृतदेह...
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 6:29 PM

 नवी दिल्लीः आपल्या प्रेमसंबंधात (Love Affairs) अडथळा ठरणाऱ्या पत्नील संपवण्यासाठी खतरनाक डाव रचला होता, त्याचा तो डाव यशस्वी झाला असता तर त्याने त्याच्या प्रेमिकाबरोबर (lover) संसार थाटणार होता. त्यामुळेच त्याने पहिल्या पत्नीला मारण्यासाठी 4 जणांना 10 लाखाची सुपारी दिली होती. त्यानंतर पत्नीवर गोळीबारही करण्यात आला मात्र त्यातूनही त्याची पत्नी वाचली, आणि त्यानंतरच यामध्ये खरे नाट्य घडले. ही घटना आहे इंडोनेशियामधील, आपल्या प्रेयसीसाठी एका नवऱ्यानेच पत्नीला ठार मारण्याचा डाव रचला, सैनिक असणाऱ्या या व्यक्तीने आपल्या बायकोला संपवण्यासाठी 10 लाखाची सुपारी चौघांना दिली होती. आणि हद्द म्हणजे सुपारी देण्यासाठी जे पैसे घेतले होते, ते त्याने आपल्याच बायकोच्या आईकडून घेतले होते म्हणजेच सासूकडून पैसे घेऊन सुपारी दिली होती.

पत्नी वाचली तरीही पैसे देणार…

द मिररच्या वृत्तानुसार सांगण्यात आले आहे की, या हल्ल्यात त्याची पत्नी वाचली तरी दहा लाखामधी अर्धी रक्कम ही शूटर्सना देण्यात येईल, त्यामुळे त्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्या पत्नीला त्याला संपवायचेच होते.

महिलेवर चार वेळा गोळीबार

नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे पत्नीवर हल्ला करण्यात आला, पण ज्यावेळी हल्ला करण्यात आला त्यावेळी त्याच्या पत्नीबरोबर त्याची मुलगी होती. त्याच्या पत्नीवर हल्ला करण्यात आला त्यावेळी एक नाही तर चार वेळा तिच्यावर गोळीबार करण्यात आला, त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली मात्र तरीही त्या हल्ल्यातून त्याची पत्नी वाचली.

…आणि  नवऱ्याचाच मृतदेह मिळाला

ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे, त्यामुळे पोलिसांनीही चौघा मारकऱ्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आली आणि चौकशीला सुरुवात करण्यात आली. चौकशीत सैनिक असणाऱ्या त्या महिलेच्या पतीचे नाव समोर आले, त्यानंतर त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र तो पोलिसांना सापडला नाही. आठवड्याभरानंतर त्याचा मृतदेहच पोलिसांना सापडला, त्यानंतर त्याच्या मृत्यूची चौकशी करण्यात आली त्यावेळी असं समजलं की, आपली पत्नी हल्ल्यातून वाचली असून आता आपल्याला पोलीस अटक करणार या भीतीनेच त्याने विष पिऊन आत्महत्या केली.

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.