AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonam Raghuvanshi Affair : राज सोनमला दीदी बोलायचा मग बॉयफ्रेंड कसा झाला? पर्सनल लाइफमध्ये कशी होती सोनम?

Sonam Raghuvanshi Affair : सोनम रघुवंशी आणि आरोपी राज कुशवाह यांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी दिलेली माहिती ही पूर्णपणे वेगळी आणि चक्रावून टाकणारी आहे. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. "हे लग्न झालं, तर परिणाम चांगले होणार नाहीत असा सोनमने लग्नआधीच आपल्या आईला इशारा दिला होता" अशी माहिती आता समोर आली आहे.

Sonam Raghuvanshi Affair : राज सोनमला दीदी बोलायचा मग बॉयफ्रेंड कसा झाला? पर्सनल लाइफमध्ये कशी होती सोनम?
Wife Sonam Hatch conspiracy to Killed Raja Raghuvanshi
| Updated on: Jun 10, 2025 | 2:46 PM
Share

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे सुरु आहेत. सोनमची जवळची मैत्रीण शिवानी आणि राज कुशवाहचा सहकारी राहुलने एका वुत्तवाहिनीशी बोलताना धक्कादायक खुलासे केले आहेत. शिवानीनुसार सोनम प्रेम प्रकरणात पडेल अशी मुलगी नव्हती. तिचं सर्व लक्ष वडिल आणि भाऊ यांच्या प्लायवूड व्यवसायावर होतं. सोनम तिच्या पर्सनल लाइफबद्दल सर्वकाही मला सांगायची असा शिवानीचा दावा आहे. राज कुशवाहसोबत प्रेमसंबंध असल्याच तिने कधी सांगितलं नाही असं तिची मैत्री शिवानी म्हणाली. अभ्यासात सोनम सरारी होती. पण बिझनेस माइंडेड होती. कुटुंबाचा व्यापार पुढे वाढवण्यात तिला रस होता असं शिवानीने सांगितलं.

राज कुशवाहचा सहकारी राहुलने राज आणि सोनममध्ये अफेअरचा मुद्दा फेटाळून लावला. ‘राज सोनमला दीदी बोलायचा. मग अफेअर कसं असू शकतं?’ असं राहुल म्हणाला. “राज खूप मेहनती होता. प्रोडक्शन थांबू नये म्हणून उशिरापर्यंत फॅक्टरीमध्ये थांबून काम करायचा” असं राहुलने सांगितलं. राहुलने दिलेल्या माहितीनुसार, “सोनमच कुटुंब राजाला मुलासारख मानायचं. अलीकडेच त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च ते उचलत होते” राज असं का करेल? सीबीआय चौकशीतून गोष्टी समोर येतील असं राहुल म्हणाला.

सोनमच्या आईला तिचं अफेअर माहित होतं का?

सोनमची मैत्रीण आणि राजच्या सहकाऱ्याच्या या वक्तव्यांनी पोलीस तपासाला नवीन दिशा दिली आहे. राजाचा भाऊ विपिन रघुवंशीने गंभीर आरोप केलेत. त्याचवेळी सोनम आणि राजच्या जवळच्या सहकाऱ्यांची स्टेटमेंट अजून गोंधळात टाकत आहेत. “हे लग्न झालं, तर परिणाम चांगले होणार नाहीत असा सोनमने लग्नआधीच आपल्या आईला इशारा दिला होता” असा दावा राजा रघुवंशीचा भाऊ विपिनने केला. विपिनच्या म्हणण्यानुसार, सोनमच्या आईला तिच्या अफेअरची पूर्ण कल्पना होती. पण तिने हे सत्य लपवून ठेवलं. सोनमच्या आईची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी विपिनची मागणी आहे.

सोनमने मोबाइल तोडून टाकलेला

राजाची हत्या 23 मे रोजी करण्यात आली. त्याच संध्याकाळी सोनम शिलॉन्ग वरुन गुवहाटीला आली. तिथून ट्रेन पकडून वारणसी मार्गे गाजीपूरला गेली. या दरम्यान तिने आपला मोबाइल फोन पोलिसांना मिळू नये म्हणून तोडून टाकला. तपासादरम्यान सोनमच सीसीटीव्ही फुटेज समोर आलय. त्यात ती आरोपींशी बोलताना दिसतेय.

Follow Us
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा