AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेड दौऱ्यात मंत्री बावणकुळे यांनी टाळला ‘तो’ रस्ता !, शेतकऱ्यांना दिवाळी गोड करण्याचे दिले आश्वासन

महसूलमंत्र्यांना शेतात उतरण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी एका शेतकऱ्याच्या शेतात परस्पर रस्ता तयार केला होता. दौऱ्यात हा रॅम्प चर्चेत आला होता.

नांदेड दौऱ्यात मंत्री बावणकुळे यांनी टाळला 'तो' रस्ता !, शेतकऱ्यांना दिवाळी गोड करण्याचे दिले आश्वासन
Minister Chandrashekhar Bawankule
| Updated on: Sep 28, 2026 | 5:30 PM
Share

गजानन देशमुख, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी : राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी नांदेड येथे आज दुष्काळ परिस्थितीची पाहणी केली आहे. यावेळी एका शेतात महसूल मंत्र्यांना अडचण होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी तात्पुरता खडक टाकून रॅम्प तयार केला होता. यावरुन महसूल मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत मदतीची तातडीची कोणतीही घोषणा न करता दिवाळी गोड करण्याचे आश्वासन मात्र शेतकऱ्यांना यावेळी दिले.

नांदेड येथे आज महसुलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांचा पाहणीदौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्याच्या एका शेतात उडी मारुन जावे लागत होते. महसुलमंत्री दौऱ्यावर येणार म्हणून अधिकारी धास्तावले. त्यानंतर या शेतात तात्पुरता खडी टाकून अधिकाऱ्यांनी मंत्र्यांसाठी रॅम्प तयार केला. हा रॅम्प मंत्री महोदयांच्या दौऱ्यात चर्चेचे कारण ठरला.

महसूलमंत्र्यांना शेतात उतरण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी एका शेतकऱ्याच्या शेतात परस्पर रस्ता तयार केला होता. बावनकुळे यांच्या पाहणी दौऱ्यात या रॅम्पची चांगलीच चर्चा, शेतकरी शेतात उड्या मारून जात असतात, मंत्री आल्यावर असा रस्ता बांधणे योग्य नाही असे यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी म्हटले आहे.

तुमची दिवाळी गोड करु

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नांदेडच्या अर्धापूर शिवारातील विमलबाई साखरे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे, शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये तुमची दिवाळी गोड करु असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना यावेळी आश्वासित केले. यावेळी महसूलमंत्र्यांना शेतात येण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या परस्पर खडी टाकून रस्ता तयार केला होता.

परंतू महसूल मंत्र्यांनी या खास त्यांच्यासाठी बांधण्यात आलेल्या रस्त्याऐवजी इतर ठिकाणाहून शेतात शिरणे पसंत केलं. यावेळी पत्रकारांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शेतकऱ्याच्या परस्पर हा रस्ता बांधल्याचे त्यांना सांगितले आणि याबाबत विचारलं असता शेतकरी बांधावरून उड्या मारून जात असतात आणि मंत्री आल्यावर अशा पद्धतीचा रस्ता तयार करणे हे मला मान्य नसल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली. यावेळी शेतकऱ्याने आपल्या अपरोक्ष परस्पर हा रस्ता निर्माण केल्याचे सांगितले.

Follow Us
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा