Sonam Operation Honeymoon : सोनमच्या 3 रहस्यांनी तीन राज्यांच्या पोलिसांची उडाली झोप… 1X3 चे कनेक्शन काय?
राजा रघुवंशीच्या हत्येच्या प्रकरणात सोनम रघुवंशीची चौकशी सुरू असून, तिने तीन प्रेमी असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. शिलॉंग पोलिसांनी '1x3 थिअरी' मांडली आहे. सोनम, राजा आणि तिच्या प्रेमींनी मेघालयात हत्या केली, त्यानंतर सोनम गुप्ततेने इंदौरला परतली. पोलिसांनी महत्त्वाचा व्हिडिओ आणि चाकू जप्त केले आहेत. हे प्रकरण तीन राज्यांना जोडले आहे.

राजा रघुवंशीच्या हत्येच्या आरोपात त्याची पत्नी सोनम रघुवंशी तुरंगात आहे. या प्रकरणाबाबत सोनम रोज नवीन खुलासे करत आहे. शिलॉन्ग पोलीस तिची चौकशी करत असून आता या प्रकरणात पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली आहे. शिलॉन्ग पोलिसांच्या या खुलाश्यामुळे इंदौर पोलिसांचीही झोप उडाली आहे. सध्या शिलॉन्ग पोलिसांच्या 1×3 थिअरीची जोरदार चर्चा सुरू आहे. पण पोलीस अजूनही राजा रघुवंशीच्या मृत्यूचं खरं कारण अद्यापही शोधू शकलेली नाहीये. पोलिसांना बुधवारी एक अशी माहिती मिळाली, ज्यामुळे एक नव्हे तीन तीन रहस्य उघड झाली आहेत. सोनम दोन नव्हे तर तीन तीन मुलांना एकसाथ हँडल करत होती. पहिला नवरा राजा, दुसरा प्रेमी राज आणि तिसरा प्रेमी संजय वर्मा. या तिघांनाही सोनम एकाच वेळी फिरवत होती. सोनमच्या या खुलाश्याने पोलिसही चक्रावून गेले असून या प्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मेघालय पोलिसांनी ऑपरेशन हनीमूनच्या अंतर्गत सखोल तपास सुरू केला आहे. 18 जून रोजी पोलिसांनी सोहरामध्ये क्राईम सीन रिक्रिएट केला होता. त्यावेळी सोनम आणि तीन सुपारी किलर उपस्थित होते. पोलीस अधीक्षक विवेक स्येम यांनी याबाबतची माहिती दिली. सोनम हत्या घडली त्या ठिकाणी उपस्थित होती. तीन आरोपींनी राजावर चाकूने वार केले. राजाच्या डोक्याच्या मागे चाकूने दोन वार केले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी एक चाकू जप्त केला आहे. दुसरा चाकू शोधला जात आहे. एक महत्त्वाचा पुरावा म्हणून हरियाणाचा युट्यूबर देवेंद्र सिहं याचा 23 मे रोजीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात सोनम, राजा आणि तीन आरोपी नोंग्रियात गावात दिसत आहेत. या व्हिडीओने हत्येची टाइमलाईन अधोरेखित केली आहे. सोनमने राजाचा फोन तोडा आणि त्याचा मृतदेह दरीत फेकण्याचा प्रयत्न केला होता.
संजयशीही गुटर गू
इंदौर एसआयटीने सोनमचा प्रेमी राज कुशावाहने आधीच हत्येची कबुली दिली होती. पण सोनमचा प्रियकर असल्याचं त्याने नाकारलं होतं. बुधवारी तपासात संजय वर्मा नावाच्या व्यक्तीचं नाव आल्याने राजच्या म्हणण्याला दुजोरा मिळाला आहे. आता राज सोबतच्या प्रेमाच्या अँगलची माहिती खोटी निघाल्यानंतर दुसरा अँगल समोर आल्याने पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. या नव्या अँगलमुळे तीन राज्यांचे पोलीस चक्रावले आहेत. सोनम आणि संजय वर्माच्या दरम्यान 200 हून अधिक संवाद झाले होते. त्यामुळे या दोघांमध्ये काही तरी सुरू होतं हे समोर आलं आहे. पण संजय या प्रकरणात सामील आहे की नाही या निर्णयाप्रत पोलीस पोहोचलेले नाहीत.
संजय हत्येत सामील होता ?
पोलिसांनी सोनमच्या कुटुंबाचीही कसून चौकशी केली आहे. सोमनसोबत राजचे प्रेम संबंध नव्हते यात तथ्य असल्याचं आता समोर येत आहे. राजाच्या कुटुंबाने सोनमचा भाऊ गोविंदवरही आरोप केले होते. गोविंदला सोनम आणि राजच्या अफेयरची माहिती होती, असं राजाच्या कुटुंबीयांचं म्हणण आहे. पण गोविंदने त्यांचे आरोफ फेटाळून लावले आहेत.
सेल्फी काढताना राजाचा मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचा बहाना सोनमने रचला होता. हा केवळ एक अपघात असल्याचं तिला भासवायचं होतं असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण 22 मे रोजी हवामान खराब असल्याने तिची योजना पार पडली नाही. त्यामुळे तिने 23 मे रोजी सुपारी किलरच्या सहाय्याने राजाचा काटा काढला. सोनमने मेघालयाच्या प्रवासाचा प्लान आखला होता. यात गुवाहाटीत कामाख्या देवीचं दर्शन आणि शिलाँगमध्ये बुकिंग होती. हत्येनंतर सोनम बुरखा घालून शिलांगहून गुवाहाटी नंतर सिलिगुडी, पटना आणि इंदौरवरून गाझीपूरला आली होती.
