मुलाला सोडवण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; पोलीस ठाण्यात नेमके काय घडले?

साधारण 10 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी गौरव भिंगारदिवे यांना बोलावून घेतलं. तुमच्या वडिलांना फिट आली आहे असं त्याला सांगितलं. गौरव जेव्हा हे पाहण्यासाठी गेला तेव्हा लॉकअप बाहेर असलेल्या मोकळ्या जागेत दीपक भिंगारदिवे हे खाली पडून होते.

मुलाला सोडवण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; पोलीस ठाण्यात नेमके काय घडले?
कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 3:42 PM

कल्याण / सुनील जाधव : मुलाला पोलीस ठाण्यात सोडवण्यास आलेल्या 65 वर्षीय राष्ट्रवादी कॉग्रेस पदाधिकाऱ्याचा पोलीस ठाण्यातच संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दीपक भिंगारदिवे यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी भिंगारदिवे यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेबाबत ट्विट करत पोलिसांवर निशाणा साधला आहे. भिंगारदिवे यांना फिट आल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर पोस्टमार्टम होणार असून, सीआयडी तपास करत असल्याची माहिती कल्याण झोन 3 पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.

कल्याण पूर्वेकडील विजयनगर परिसरात भिंगारदिवे कुटुंब राहतं. शुक्रवारी 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 च्या सुमारास प्रशिक भिंगारदिवे या तरुणाला कोळसेवाडी पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले. पोलीस आपल्या मुलाला का घेऊन गेले? याबाबत जाणून घेण्यासाठी प्रशिकचा भाऊ गौरव आणि वडील दीपक भिंगारदिवे हे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गेले. यावेळी भावाची चौकशी करत असताना प्रशिक हा तपास कक्षात बसला असल्याचं त्यांनी पाहिलं.

यावेळी साधारण पावणे दहा वाजले होते. मुलाची चौकशी करण्यासाठी वडिल पुढे गेले. यावेळी वडिलांचा कॅमेरा चुकून सुरु झाला असं गौरव भिंगारदिवे यांनी दावा केला आहे. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि ते दीपक यांना घेऊन गेले. माझ्या वडिलांचा मोबाईल पोलिसांनी काढून घेतला. मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करता का? असा जाब विचारत त्यांची कॉलर पकडत त्यांना हाताने मारहाण केली असा आरोप करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

यानंतर पोलीस दीपक यांना घेऊन लॉकअपकडे गेले. साधारण 10 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी गौरव भिंगारदिवे यांना बोलावून घेतलं. तुमच्या वडिलांना फिट आली आहे असं त्याला सांगितलं. गौरव जेव्हा हे पाहण्यासाठी गेला तेव्हा लॉकअप बाहेर असलेल्या मोकळ्या जागेत दीपक भिंगारदिवे हे खाली पडून होते. त्यांना नजीकच्या एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

तिथे डॉक्टरांनी गाडीतच तपासून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दुसऱ्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता दीपक हे मयत झाले असल्याचं सांगण्यात आले. दीपक यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, वडिलांचा मृत्यू फिट आल्याने झाल्याचं पोलीसांकडून समजलं असलं तरी मृत्यूच नेमकं कारण काय? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी गौरव याने नमूद तक्रारीत केली आहे. त्याचप्रमाणे वडिलांना डायबिटीसचा आजार असून, त्यावर त्यांची औषध सुरू आहे, असा उल्लेख देखील तक्रारीत करण्यात आला आहे.

पोलीस काय म्हणाले?

प्रशिकच्या वडिलांना जेव्हा कळलं की मुलगा पोलीस स्टेशनमध्ये आहे, तेव्हा ते स्वतः पोलीस ठाण्यात आले. तिथे ते व्हिडीओ शूटिंग करत पोलिसांशी बाचाबाची करू लागले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अंमलदार कक्षाच्या बाजूला नेले, तिथे त्यांना फिट आली. त्यांना हॉस्पिटलमध्येही घेऊन गेलो तेव्हा तिथे मृत घोषित करण्यात आलं. या सर्व घटनेचं रेकॉर्डिंग पोलीस स्टेशन बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात झालं आहे. या घटनेची सीआयडीकडून देखील चौकशी सुरू झाली आहे, अशी माहिती कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांचा पोलिसांवर निशाणा

पोलीस ठाण्यात झालेल्या मृत्यूप्रकरणी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पोलिसांना ही मग्रुरी कशामुळे आली या ठाण्यामध्ये ? कायदा बाजूलाच जाऊ द्या, मारो झोडो, केस डालो निकल जाव कानून उपर रख दो फेक दो सलोको अशी परिस्तिथी आहे ठाण्यात आहे. कायद्याची सगळी पुस्तकं मुंब्य्राच्या खाडीत टाकली असून, जाळे टाकलं तर ते मिळतील अशा प्रकारची खोचक टीका प्रशासनावर केली आहे.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.