Punjab School bus Attack : पंजाबमध्ये स्कूल बसवर तलवारीने हल्ला, मुलांना वाचवण्यासाठी जखमी ड्रायव्हरने केले असे काही…वाचा काय घडले ?

बर्नाला हवाई दलाच्या केंद्रीय विद्या मंदिर शाळेच्या मुलांनी भरलेल्या बसवर बुधवारी काही हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हल्ल्यावेळी बसमध्ये सुमारे 34-35 मुले होती. शाळा सुटल्यानंतर बस मुलांना घरी सोडण्यासाठी जात होती.

Punjab School bus Attack : पंजाबमध्ये स्कूल बसवर तलवारीने हल्ला, मुलांना वाचवण्यासाठी जखमी ड्रायव्हरने केले असे काही...वाचा काय घडले ?
पंजाबमध्ये स्कूल बसवर तलवारीने हल्ला
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 6:43 PM

पंजाब : दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी स्कूल बसवर तलवारीने हल्ला (Sword Attack) केल्याची खळबळजनक घटना पंजाबमधील बर्नाला येथे घडली आहे. या हल्ल्यात बसचा चालक जखमी (Injured) झाला. धारदार शस्त्रांनी या हल्लेखोरांनी बसच्या खिडक्या फोडल्या. यादरम्यान बस चालकाने सावधगिरी बाळगत स्कूल बस (School Bus) जवळच्या डीएसपी कार्यालयात नेली. त्यामुळे मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. हल्लेखोराला पकडण्यात आल्याचे बर्नाला डीएसपींनी म्हटले आहे. बसचा ड्रायव्हर लखविंदर सिंग याने पोलिसांना सांगितले की, काही दिवसांपूर्वी माझा काही लोकांशी वाद झाला होता. मी बस घेऊन जात असताना काही लोकांनी बसवर हल्ला केला. त्यांनी बस थांबवून मला बसमधून उतरण्यास सांगितले आणि तलवारीने हल्ला केला.

स्कूल बसवर तलवारीने हल्ला

बर्नाला हवाई दलाच्या केंद्रीय विद्या मंदिर शाळेच्या मुलांनी भरलेल्या बसवर बुधवारी काही हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हल्ल्यावेळी बसमध्ये सुमारे 34-35 मुले होती. शाळा सुटल्यानंतर बस मुलांना घरी सोडण्यासाठी जात होती. त्यानंतर अचानक चार मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी बस थांबवून बसवर तलवारी उगारण्यास सुरुवात केली. यादरम्यान बसचे शीड तुटले. तलवार हल्ल्यात बसचा चालक लखविंदर सिंग जखमी झाला. प्रसंगाची निकड ओळखून लखविंदरने बस पूर्ण वेगाने जवळच असलेल्या बर्नाला डीएसपीच्या कार्यालयात नेली.

बसवर ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला त्यामुळे प्रचंड घबराट निर्माण झाल्याचे बस हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. शहरात गुंडगिरीचा हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण आहे. असे हल्ले रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि सध्याच्या सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. स्कूल बसवर अशा प्रकारे खुनी हल्ला होणे ही मोठी बाब आहे.

हे सुद्धा वाचा

पालकांमध्ये संताप्त भावना

स्कूल बसवर अशा प्रकारे हल्ला करणे अत्यंत धोकादायक आहे. या हल्ल्याबाबत कुटुंबीयांनी शाळा आणि प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुलांना रोज शाळेत जावे लागते. गुंडगिरीचा हा प्रकार अतिशय घातक आहे. आम्हाला न्याय हवा आहे आणि दोषींना लवकरात लवकर पकडले पाहिजे, असे घाबरलेल्या मुलांच्या पालकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी एका आरोपीला पकडण्यात आल्याचे डीएसपी बर्नाला सतवीर सिंह बैंस यांनी सांगितले. हल्लेखोरांचा बस चालकाशी जुना वाद होता, त्यातूनच हा हल्ला झाला. सर्व मुले सुरक्षित असून सर्वांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे. बसवरील हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, याबाबत चौकशी केली जात आहे. लवकरच उर्वरित हल्लेखोरांना अटक करण्यात येईल, असे आश्वासनही सतवीर सिंह यांनी दिले. (Sword attack on school bus in Punjab, driver injured, one accused arrested)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.