AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खामेनेई ठार होताच भारतासह जगभरातील मुस्लिम रस्त्यावर का येत आहेत? कोणत्या पंथाशी आहे खास कनेक्शन? अमेरिकेचं टेन्शन वाढणार?

इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मृत्यूनंतर जगभरातील शिया पंथीय मुस्लिम रस्त्यावर उतरले आहेत. खामेनेईंशी शिया पंथाचे खास कनेक्शन असल्याने हा संताप आहे. अमेरिकेवर हल्ल्याचा आरोप असून, इराण-अमेरिका संघर्ष चिघळला आहे. यामुळे जागतिक स्तरावर तेलाचे दर वाढले आहेत, तसेच भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि पश्चिम आशियातील भारतीयांच्या सुरक्षेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

खामेनेई ठार होताच भारतासह जगभरातील मुस्लिम रस्त्यावर का येत आहेत? कोणत्या पंथाशी आहे खास कनेक्शन? अमेरिकेचं टेन्शन वाढणार?
आयातुल्लाह खामेनेई
| Updated on: Mar 02, 2026 | 12:49 PM
Share

अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खामेनेई ठार झाले आहेत. त्यामुळे इराणचा भडका उडाला आहे. इराणने याचा बदला म्हणून अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष केलं आहे. तसेच मशिदीवर लाल झेंडा फडकवून रक्तरंजित उठावाचा इशारा दिला आहे. खामेनेईच्या मृत्यूने केवळ इराणच भडकलेला नाही. तर, त्याचे जगभरात संतप्त पडसाद उमटले आहेत. भारतापासून ते विविध देशातील लोक रस्त्यावर उतरून निषेध नोंदवत आहेत. आंदोलन करत आहेत. अमेरिकेच्या दादागिरीवर आगपाखड करत आहेत. विशेष म्हणजे रस्त्यावर उतरलेले सर्व नागरिक हे शिया पंथीय मुस्लिम आहे. या शिया पंथाचं खामेनेई यांच्याशी खास कनेक्शन असल्यानेच हे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी या युद्धाचं विश्लेषण केलं आहे. इस्लाममध्ये शिया आणि सुन्नी असे दोन पंथ आहेत. जगामध्ये इराण हा शिया बहुल देश आहे. इराणमध्ये सर्वाधिक संख्या शिया पंथीयांची आहे. त्यामुळेच इराणच्या राजकारणात शिया पंथीयांचा बोलबाला राहिला आहे. खामेनेई हे शिया पंथाचे सर्वोच्च धर्मगुरू मानले जातात. इराणचे सर्वोच्च लीडर होण्यापूर्वी ते धर्मगुरू म्हणून काम पाहत होते. सर्वोच्च नेते झाल्यावरही धर्मगुरू म्हणून त्यांची मान्यता होती. आता अमेरिकेने त्यांचाच खात्मा केल्यामुळे जगभरामध्ये शिया पंथी रस्त्यावर येत आहेत. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, दिल्ली वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे निदर्शने होत आहेत, असं सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी सांगितलं.

आंदोलनकर्ते शिया पंथाचे

भारतामध्ये जी सर्व आंदोलने होत आहेत, ती सगळी आंदोलने शिया पंथीयांनी केली आहेत. आतापर्यंत ही आंदोलन शांततेत झाली. मात्र पाकिस्तानमध्ये हिंसक आंदोलन झालं. मुस्लिम ब्रदर हुड म्हणून सगळ्या जगातील मुस्लिम देशाने एकत्र यावं आणि संघर्ष करावा, असं काही लोकांच म्हणणं आहे, असंही सतीश ढगे यांनी सांगितलं.

इराण, इस्रायल आणि अमेरिका या संघर्षाला आता क्षेत्रीय युद्धाचं रूप प्राप्त झाल आहे. आखाता मधल्या अरब देशाच्या सहा देशाच्या समूहाने एक संयुक्त निवेदन जारी केलं आहे. इराणने जर आता हल्ले केले तर आता आम्ही सुद्धा आमची तटस्थ भूमिका सोडून या युद्धामध्ये सक्रिय होऊ असं या देशांनी ठणकावलं आहे. एक प्रकारे या युद्धाला क्षेत्रीय युद्धाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. आता अमेरिकेच्या बाजूने फ्रान्स, युरोपीयन युनियन यासारख्या देशाने सुद्धा पाठिंबा दिला आहे. इराणकडून, IRGC कडून आणि इराणच्या नेव्हीकडून स्टेट ऑफ फार्मूज ब्लॉक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, असंही ते म्हणाले.

म्हणून इंधन महागले

आम्ही ज्या ठिकाणी मिसाईल हल्ले केले त्यामध्ये 560 सैनिक मारले आहेत किंवा जखमी झाले आहेत, असा इराणचा दावा आहे. तर अमेरिकेने तीन ते चार अमेरिकन सैनिकेचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. खरोखरच IRGC ने अशी आक्रमक भूमिका ठेवली तर येणाऱ्या काळात अमेरिकासुद्धा इराणवर तुटून पडेल. डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की, अमेरिकेच्या ज्या मागण्या आहेत त्या इराने पूर्ण कराव्यात. प्रत्येक दिवसागणिक इराणचं सामर्थ्य कमी होत जाणार आहे. पर्शियन आखाताला ब्लॉक करण्याचा जो इराणचा प्रयत्न आहे त्याचा विपरीत परिणाम आपल्याला जागतिक स्तरावर दिसतोय. त्याचाच भाग म्हणून एका दिवसात कच्च्या केल्याच्या किमती 83 डॉलर प्रति बॅरल प्रमाणे जागतिक स्तरावर पोहोचल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

बघ्याची भूमिका घेऊ नये

काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली CCS अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. वेस्ट आशियामधील संघर्षावर कालच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. अरब राष्ट्रात 90 लाख भारतीय लोक राहतात. त्यांच्या सुरक्षिततेविषयी आणि भविष्यात त्यांना रोजगाराची गरज पडली तर त्यांना युद्धजन्य परिस्थितीत भारतात आणण्याचा प्लॅन राबवावे लागणार आहेत. त्या अनुषंगाने सुद्धा बैठकीत चर्चा झाली. या संघर्षात भारताने बघायची भूमिका घेऊन चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरब राष्ट्राच्या काही नेत्या सोबत चर्चा केली आहे. हा संघर्ष चिघळला तर भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती वाढल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report