AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole : तेजिंदर सिंग तिवानाची नाना पटोलेंविरोधात मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात याचिका दाखल

देशाचे पंतप्रधानाचा पद हा घटनात्मक पद आहे आणि या पदाचा अपमान करणं हा संपूर्ण देशाचा आणि भारतातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. देशाच्या न्याय प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास असून वेळ आल्यावर आम्हाला नक्कीच न्याय मिळेल आणि नाना पटोले यांच्यावर न्यायालयाकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असे तिवाना म्हणाले.

Nana Patole : तेजिंदर सिंग तिवानाची नाना पटोलेंविरोधात मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात याचिका दाखल
तेजिंदर सिंग तिवानाची नाना पटोलेंविरोधात मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात याचिका दाखल
| Edited By: | Updated on: Jan 25, 2022 | 1:14 AM
Share

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्याविरोधात अशोभनीय वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबई कार्यकर्त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. आज युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना(Tejinder Singh Tiwana) यांनी शिवडी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात नाना पटोले यांच्या विरोधात याचिका दाखल केली असून कलम 153 बी, 500, 504, 505(2), 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. देशाचे पंतप्रधानाचा पद हा घटनात्मक पद आहे आणि या पदाचा अपमान करणं हा संपूर्ण देशाचा आणि भारतातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. देशाच्या न्याय प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास असून वेळ आल्यावर आम्हाला नक्कीच न्याय मिळेल आणि नाना पटोले यांच्यावर न्यायालयाकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असे तिवाना म्हणाले. न्यायालयाने तेजिंदर सिंग तिवाना यांची याचिका स्वीकारून 28 जानेवारी 2022 ही तारीख वादविवाद आणि निकालासाठी ठेवली आहे, असे अॅड.मदन गुप्ता यांनी सांगितले. (Tejinder Singh Tiwana files petition against Nana Patole in Metropolitan Magistrate Court)

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या अशोभनीय वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला होता. त्यांनी 18 जानेवारी रोजी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकाबाहेर आंदोलन केले आणि एफआयआर नोंदवण्याची मागणी केली होती. त्यावर डीसीपी यांनी युवा मोर्चा कार्यकर्त्यांना आश्वासन दिले की, आज भंडारा येथे एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर आज भंडारा येथे काही कारणास्तव एफआयआर नोंदविला गेला नाही तर येथे एफआयआर नोंदविला जाईल.

नाना पटोलेंच्या बेताल वक्तव्याविरोधात भाजपचे राज्यव्यापी आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भाजपने सोमवारी राज्यव्यापी आंदोलन केले. यावेळी नाना पटोलेंच्या विधानाचा निषेध करण्यात आला. ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, गडचिरोलीत भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पटोलेंचा निषेध केला. ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांनी पटोलेंचा तीव्र निषेध व्यक्त करत बॅनरबाजी आणि पटोलेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. औरंगाबादमध्ये रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. (Tejinder Singh Tiwana files petition against Nana Patole in Metropolitan Magistrate Court)

इतर बातम्या

Why I killed Ganghi विरोधात काँग्रेस आक्रमक, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत केली ही मागणी

केंद्रातील भाजपा सरकारकडून गांधी विचार संपवण्याचा डाव  –  नाना पटोले

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.