इन्स्टाग्रामवर मैत्री, रुमवर बोलवायची, 100 लोकांशी शारीरिक संबंध, शेवटच्या व्यक्तीने थेट….
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये नवरा बायको यांनी कर्ज फेडण्यासाठी जे काही केलं ते पाहून पोलीस देखील चक्रावले आहेत.

Telangana Karimnagar: तेलंगणा राज्यातील करीमनगर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरेपल्ली परिसरात राहणाऱ्या एका पती-पत्नीला पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या ‘हनीट्रॅप’ आणि ब्लॅकमेलिंग रॅकेटचे सूत्रधार असल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. कर्जातून मुक्त होण्यासाठी आणि सुखी जीवन जगण्याच्या लालसेपोटी या दाम्पत्याने नैतिकतेची सर्व बंधने झुगारून दिल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या दाम्पत्याने आतापर्यंत सुमारे 1500 पुरुषांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे. आरोपी पत्नी सोशल मीडियाचा गैरवापर करत असल्याचे समोर आले आहे. ती इंस्टाग्रामवर ‘Lallydimplequeen’ आणि यूट्यूबवर ‘Karimnagar pilla 143’ या नावाने अकाउंट्स चालवत होती. ग्लॅमरस फोटो, आकर्षक व्हिडिओ आणि गोड बोलण्याच्या माध्यमातून ती पुरुषांशी मैत्री वाढवत असे.
मैत्री झाल्यानंतर संबंधित पुरुषांना ती आपल्या रुमवर बोलावायची. तेथे तिचा पती गुप्तपणे या खाजगी क्षणांचे व्हिडिओ काढायचा. या व्हिडिओंचा वापर नंतर संबंधित व्यक्तींना धमकावण्यासाठी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी केला जात होता. तपासात असेही उघड झाले आहे की आरोपी महिलेने सुमारे 100 पुरुषांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
ब्लॅकमेलिंगच्या पैशातून प्रचंड संपत्ती
या घाणेरड्या धंद्यातून मिळालेल्या काळ्या पैशांमुळे हे दाम्पत्य अल्पावधीतच श्रीमंत झाले. ब्लॅकमेलिंगमधून मिळालेल्या पैशांतून त्यांनी आरेपल्ली परिसरात 65 लाख रुपयांचा प्लॉट खरेदी केला. याशिवाय 10 लाख रुपयांची आलिशान कार तसेच घरामध्ये लाखो रुपयांचे महागडे फर्निचर आणि इतर वस्तू घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. हे सर्व काही त्यांनी अवघ्या काही महिन्यांत मिळवल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या संपूर्ण रॅकेटचा भंडाफोड तेव्हा झाला जेव्हा करीमनगरमधील एका लॉरी व्यावसायिकाने धैर्य दाखवत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या व्यावसायिकाकडून आरोपी दाम्पत्याने आधीच 13 लाख रुपये उकळले होते. मात्र, एवढ्यावर न थांबता त्यांनी पुन्हा 5 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची तसेच कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. या धमक्यांमुळे घाबरून न जाता व्यावसायिकाने थेट पोलिसांची मदत घेतली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सापळा रचून या दाम्पत्याला अटक केली.
सध्या पोलिसांकडून या रॅकेटशी संबंधित इतर पीडितांचा शोध घेतला जात असून सोशल मीडियावरून होणाऱ्या अशा गुन्ह्यांविरोधात अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
