AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंगावरील दागिने कागदाच्या पुडीत ठेवायला सांगितले, मग हातचलाखी करत चोरटे पसार

अंबरनाथमध्ये राहणारे वसंत सरगर यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते टेम्पोमध्ये डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जात होते.

अंगावरील दागिने कागदाच्या पुडीत ठेवायला सांगितले, मग हातचलाखी करत चोरटे पसार
अंबरनाथमध्ये टेम्पोचालकाला लुटलेImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Oct 28, 2022 | 8:44 PM
Share

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये पोलीस असल्याची बतावणी करत एका चौकडीने टेम्पो चालकाला लुटल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ पूर्वेतील आनंदनगर एमआयडीसी भागातील सुदामा हॉटेलजवळ हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या भामट्यांचा शोध घेत आहेत.

टेम्पोमध्ये डिझेल भरण्यास चालले होते

अंबरनाथमध्ये राहणारे वसंत सरगर यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते टेम्पोमध्ये डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जात होते. तिथून पुन्हा आनंदनगर एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ असलेल्या टेम्पो स्टॅंडवर जाण्यासाठी ते दुचाकीवरून निघाले.

चौघांनी दागिने काढून पुडीत ठेवण्यास सांगितले

यावेळी सुदामा हॉटेल जवळच रस्त्याच्या मधोमध थांबलेल्या चार जणांनी त्यांना गाडी बाजूला घ्यायला सांगितली. यानंतर अंगावरील सोन्याची चैन, ब्रेसलेट आणि अंगठी हे दागिने एका कागदाच्या पुडीत बांधायला सांगितलं.

यानंतर ही पुडी व्यवस्थित बांधली आहे? की नाही? हे पाहण्यासाठी या चौघांनी हातात घेतली आणि लगेचच सरगर यांना परत देखील केली. त्यानंतर हे चौघे तिथून बदलापूरच्या दिशेने निघून गेले. काही वेळाने सरगर यांनी ही पुडी उघडून पाहिली असता त्यांना त्यामध्ये चक्क लाल माती भरल्याचं आढळून आलं.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठत याबाबतची तक्रार केली. सरगर यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत भामट्यांचा शोध सुरू केला आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजपर्यंत पोलीस असल्याची बतावणी करून अशाच पद्धतीने चार जणांना लुबाडण्यात आलंय. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या भावाचा देखील समावेश होता.

विशेष म्हणजे आनंदनगर एमआयडीसी आणि पाईपलाईन रोड या भागातच हे गुन्हे घडले असून, यापैकी एकाही गुन्ह्याचा अद्याप शिवाजीनगर पोलिसांना छडा लावता आलेला नाही. त्यामुळे या भामट्यांची हिंमत वाढत चालली असून त्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याचं आता बोललं जातंय.

Follow Us
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...