पत्नीच्या आजारपणामुळे कर्जबाजारी झाला, अखेर नैराश्यतेून पतीने उचलले ‘हे’ टोकाचे हे पाऊल

संजय चौगुले यांच्या पत्नीचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्यांच्या उपचारासाठी मोठा खर्च होता.

पत्नीच्या आजारपणामुळे कर्जबाजारी झाला, अखेर नैराश्यतेून पतीने उचलले 'हे' टोकाचे हे पाऊल
सांगलीत नैराश्येतून पतीची आत्महत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Nov 07, 2022 | 3:26 PM

सांगली : कर्ज आणि पत्नीच्या आजारपणाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वशी येथे घडली आहे. संजय चौगुले असे आत्महत्या करणाऱ्या 37 वर्षीय पतीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पत्नीच्या आजारपणासाठी भरपूर पैसा खर्च होत होता. यासाठी संजयला कर्ज घ्यावे लागले होते. हे कर्ज फेडणे संजयला अशक्य झाले होते.

पत्नीचा काही दिवसांपूर्वी झाला होता अपघात

संजय चौगुले यांच्या पत्नीचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्यांच्या उपचारासाठी मोठा खर्च होता. यामुळे पत्नीच्या उपचारासाठी संजय यांनी कर्ज घेतले होते.

पत्नीचे आजारपण आणि कर्ज यामुळे चिंतेत होते

एवढा पैसा खर्च करुन उपचार करुनही पत्नीच्या प्रकृतीत सुधारण होत नव्हती. तसेच डोक्यावरचे कर्जही वाढत चालले होते. यानंतरही चौगुले यांच्या समस्या संपण्याचे नावच घेत नव्हत्या. काही दिवसांपूर्वी चौगुले यांच्या घरातील शेळ्या चोरीला गेल्या. संकटे थांबण्याचे नावच घेत नव्हते, त्यामुळे चौगुले सतत चिंतेत असायचे.

हे सुद्धा वाचा

नैराश्येतून चौगुलेंची आत्महत्या

पत्नीही बरी नव्हती आणि डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा बोजा कसा फेडायचा या विवंचनेतून चौगुले यांनी राहत्या घराच्या शेजारी असलेल्या शेतातील शेडमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.