संत जगनाडे महाराज पतसंस्थेत साडेतीन कोटींचा अपहार, ठेवीदारांची फसवणूक

संत जगनाडे महाराज हाउसिंग क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सन 2001 ते2021 या कालावधीत 70 ते 90 च्या वर ठेवीदारांच्या ठेवींवर बनावट सर्टिफिकेट तयार करून अवैधपणे कर्ज उचलण्यात आले.

संत जगनाडे महाराज पतसंस्थेत साडेतीन कोटींचा अपहार, ठेवीदारांची फसवणूक
संत जगनाडे महाराज पतसंस्थेत साडेतीन कोटींचा अपहारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Nov 07, 2022 | 2:10 PM

नागपूर : नागपूरच्या संत जगनाडे महाराज हाउसिंग क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. शाखाप्रमुख आणि इतर कर्मचाऱ्यांनी मिळून ठेवीदारांची 3 कोटी 36 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तहसिल पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एकूण चार आरोपी आहेत. यातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. या आरोपींमध्ये पतसंस्थेत काम करणाऱ्या रोखपाल, शाखा मॅनेजर आणि काही क्लार्कचा समावेश आहे.

ठेवीदारांच्या ठेवींवर अवैध कर्ज उचलले

संत जगनाडे महाराज हाउसिंग क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सन 2001 ते2021 या कालावधीत 70 ते 90 च्या वर ठेवीदारांच्या ठेवींवर बनावट सर्टिफिकेट तयार करून अवैधपणे कर्ज उचलण्यात आले. यासोबतच पतसंस्थेमध्ये जमा असलेल्या ठेवीवरील या आरोपींनी संगनमत करून अवैधपणे कर्ज उचलले.

ऑडिट करताना फसवणूक उघड

सरकारच्या वतीने आलेल्या ऑडिटरच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी आणि शाखा व्यवस्थापकांनी ठेवींवर अवैध कर्ज घेतल्याचा प्रकार उघडकीस आला.

हे सुद्धा वाचा

चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

याप्रकरणी तहसिल पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन जणांना अटक केली तर यातील एकाचा मृत्यू झाला.

ठेवीदारांच्या पैशाचे काय?

नागरिकांनी आपली मेहनतीची कमाई मोठ्या विश्वसाने बँकेत ठेवली. मात्र बँकमधील कर्मचाऱ्यांनीच हा घोटाळा केल्याने याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागणार का हा प्रश्न आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.