Palghar Kidnapping : टीईटी घोटाळ्याची मुलीच्या अपहरणाशी लिंक?, पालघर जिल्ह्यात प्रचंड खळबळ

आरोपी पत्रकाराने पोलिसांच्या ताब्यात असताना टीईटी घोटाळ्याचा उल्लेख केल्यामुळे या सर्व घटनेचे संबंध टीईटी घोटाळ्याशी असू शकतील, असा संशय व्यक्त केला जात आहे.

Palghar Kidnapping : टीईटी घोटाळ्याची मुलीच्या अपहरणाशी लिंक?, पालघर जिल्ह्यात प्रचंड खळबळ
टीईटी घोटाळ्याची मुलीच्या अपहरणाशी लिंक?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 4:36 PM

पालघर : राज्याच्या सत्ता बदलादरम्यान राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या शिक्षक पात्रता घोटाळ्याची (टीईटी) पालघरमधील मुलीच्या अपहरण (Kidnapping) घटनेशी लिंक असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. वाडा तालुक्यातील 12 वर्षीय मुलीचे काल (शुक्रवारी) सायंकाळी अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 12 तासांत या घटनेचा छडा लावला आणि अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला पोलीस पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी घेऊन जात होते. याचदरम्यान त्या आरोपी पत्रकाराने टीईटी घोटाळ्या (TET Scam)चा उल्लेख करून सर्वानाच धक्का दिला आहे. त्यामुळे अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना टीईटी घोटाळ्याचेही पुरावे (Evidence) हाती लागू शकतात, अशी शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.

मुलीचे स्विफ्ट डिझायर कारमधून केले होते अपहरण

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अशोकवन येथून 12 वर्षांच्या मुलीचे काल संध्याकाळी साडेपाच वाजता स्विफ्ट डिझायर कारमथून अपहरण करण्यात आले होते. घटनेचे खबर मिळताच पोलिसांनी अत्यंत जलदगतीने तपासाची चक्रे फिरवली. यादरम्यान गावातील स्थानिक लोकांकडून काही माहिती हाती लागते का? याचा शोध घेण्यात आला. यावेळी काही महत्वपूर्ण धागेदोरे हाती लागले. त्या माहितीच्या आधारे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकले. पोलिसांनी अपहरणकर्त्या मुलीची सुटका करीत मोठी कामगिरी केली. पोलिसांच्या या तत्परतेनंतर मुलीच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. आरोपीने वाडा तालुक्यातील ऐनशेत गावातील एका फार्म हाऊसमधून मुलीला नेले होते. पोलीस पथक तेथे पोहोचले आणि अपहरणकर्त्या मुलीची सुटका, तर आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांनी यश मिळवले.

टीईटी घोटाळ्यातील धक्कादायक बाबी उजेडात येण्याची शक्यता

आरोपी पत्रकाराने पोलिसांच्या ताब्यात असताना टीईटी घोटाळ्याचा उल्लेख केल्यामुळे या सर्व घटनेचे संबंध टीईटी घोटाळ्याशी असू शकतील, असा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपीला पोलिस घेऊन जाता होती. त्यावेळी त्या आरोपी पत्रकाराने टीईटी शिक्षण घोटाळा बाहेर निघाला पाहिजे, असे खळबळजनक वक्तव्य केले. त्यामुळे या अपहरणाचा संबंध टीईटी घोटाळ्याशी असण्याची शक्यता बळावली आहे. जर आरोपीचा घोटाळ्याशी संबंध असल्याचे उघड झाले तर टीईटी घोटाळ्यातील मोठे मासे हाती लागू शकतील आणि राजकीय वर्तुळात पुन्हा मोठा भूकंप घडला जाऊ शकतो, असेही बोलले जात आहे. मुलीचे वडील आणि आरोपी यांच्यात शिक्षण क्षेत्राशी संबंधित काही गैरसमज झाल्यामुळे आरोपीने मुलीचे अपहरण केल्याचे कबूल केले आहे, अशी माहिती पालघर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. (The TET scam is suspected to be linked to the abduction of a girl in Palghar)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.