AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : गरीब रिक्षावाल्यासोबत महिला ज्या क्रूरतेनं वागली, ते पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल!

गरिब रिक्षावाला आपण घाईत असल्याचं म्हणत हात जोडतो, संतापलेल्या महिलेला समजावण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. पण महिला जराही ऐकून न घेता गरीब रिक्षावाल्याला जबर मारहाण करते.

Video : गरीब रिक्षावाल्यासोबत महिला ज्या क्रूरतेनं वागली, ते पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल!
नोएडातील संतापजनक घटनाImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Aug 13, 2022 | 1:38 PM
Share

नोएडामध्ये शिविगाळ करणारा श्रीकांत त्यागीचा (Shrikant Tyadi Case) व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Video Viral) झाला होता. इतका की त्याला अंडरग्राऊंड व्हावं लागलं होतं. अखेर त्याला अटकही करण्यात आली होती. महिलेला घाणेरड्या शिव्या देण्यासोबत धमकावण्याचा आरोप श्रीकांत त्यागीवर करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. नोएडामध्ये एका महिलेनं गरीब रिक्षा चालकाला शिविगाळ करत त्याला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून महिलेनं केलेल्या मारहाणीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. याप्रकरणी आता महिलेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरतेय. अर्वाच्च शिविगाळ करत रिक्षाचालकाला (Auto Rikshaw Driver) मारहाण करणाऱ्या महिलेचं कृती समर्थनीय कशी काय असू शकते, असा सवाल सोशल मीडियातून उपस्थित केला जातोय. अखेर या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली जात असल्याचं म्हटलंय.

नेमकं काय झालं?

गरीब रिक्षा चालकाचं आणि महिलेच्या गाडीचा धडक झाली. त्यामुळे संतापलेल्या महिलेनं ई-रिक्षा चालकाना अक्षरशः फरफटत आणलं आणि त्याला शिविगाळ करत जाब विचारला. गाडीला झालेल्या नुकसानीवरुन ही महिला रिक्षा वाल्यावर राग काढत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलंय. गरिब रिक्षावाला आपण घाईत असल्याचं म्हणत हात जोडतो, संतापलेल्या महिलेला समजावण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. पण महिला जराही ऐकून न घेता गरीब रिक्षावाल्याला जबर मारहाण करते. त्याला शिविगाळ करतो. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर महिलेविरोधात संताप व्यक्त केला जातोय.

पाहा व्हिडीओ :

सोशल मीडियामध्ये या महिलेचा व्हिडीओ व्हायरल जाल्यानंतर अखेर महिलेविरोधात पोलिसात तक्रा नोंदवण्यात आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही घटना त्याच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे, जिथं श्रीकांत त्यागी प्रकरण घडलं होतं. नोएडा फेज टू पोलिस ठाण्याच्या हद्दी घडलेल्या या घटनेनं महिलेविरोधात तक्रार नोंदवून घेण्यात आली असून पुढील कारवाई केली जाते आहे, असं पोलिसांनी म्हटलंय.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.