घरात कोणी नव्हते, कन्येने प्रियकराला बोलावले, मग शिक्षक पित्याने खडसावल्याने भयंकर घडले

घरात कोणी नसल्याचे पाहून दहावीची विद्यार्थीनी असलेल्या मुलीने तिच्या प्रियकराला घरी बोलावले. परंतू अचानक घरी वडीलांनी मुलीला प्रियकरासोबत पाहून तिला आणि प्रियकराला बोल सुनावले मग जे घडले...

घरात कोणी नव्हते, कन्येने प्रियकराला बोलावले, मग शिक्षक पित्याने खडसावल्याने भयंकर घडले
Do not enter.
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 7:42 PM

लखनऊ : वडील शाळेत वर्गावर गेलेले तर आई पोलिओ अभियानासाठी आणि आजोबा बाजारात गेलेले, घरात कुणीच नव्हते याचा फायदा त्या दोघांनी घ्यायचा ठरविले. आणि मुलीने आपल्या प्रियकराला घरात प्रवेश दिला. त्याचवेळी अचानक शाळेते गेलेले वडील घाईगडबडीत दुपारच्या सुटीत घरात आले आणि त्यांनी या दोघांना एकत्र पाहिल्याने त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी दोघांना शिवीगाळ आणि मारहाण केली. मात्र त्यानंतर जे भयंकर घडले त्याने अख्खा गाव सुन्नं झाला आहे.

कोतवाली हाथरस गेट क्षेत्रातील नगला अलगर्जी गावातील 47 वर्षीय शिक्षकाची दहावीची मुलगी घरी एकटीच होती, त्यामुळे तिने प्रियकराला घरात बोलावले. घरात कोणीच नव्हते त्यामुळे दोघांनी याचा फायदा घेतला. परंतू दुपारच्या सुटीत अचानक वडील घरी आले. त्यांनी दोघांना घरात पाहीले आणि त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यानी दोघांना शिवीगाळ करायला सुरुवात केली.

त्यामुळे शब्दाला शब्द वाढत गेला आणि मारहाण सुरू झाली. दोघांनी मिळून पित्याच्या डोक्यात सळई घातली. त्यानंतर चाकूने गळ्यावर वार करून मृत पित्यास हॉलमध्ये टाकून दोघेही पसार झाले. या घटनेचे वृत्त कळताच गावात हल्लकल्लोळ झाला, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाच पंचनामा करीत मृताचा मुलगा आणि वडीलांची चौकशी केली. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला.

वडील शिक्षक, आई पोलीओ अभियानात

मुलीचे वडील शाळेत गेले होते. तर आई पोलिओ प्रतिबंधक लसीच्या प्रचारासाठी बाहेर गेली होती. घरात कोणी नसल्याचे पाहून दहावीची विद्यार्थीनी असलेल्या मुलीने तिच्या प्रियकराला घरी बोलावले. परंतू अचानक घरी वडीलांनी मुलीला प्रियकरासोबत पाहून तिला आणि प्रियकराला बोल सुनावले. वाद वाढत गेला आणि सळईने दोघांनी त्यांच्या डोक्यात वार केला. त्यानंतर चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केल्याने रक्ताच्या थारोळ्यात ते पडले.

आजोबांनी दरवाजा तोडला

इतक्यात मुलीच्या आजोबांनी घराचा दरवाजा वाजविला. तेव्हा दरवाजा न उघडल्याने त्यांनी दरवाजा धक्का मारून उघडला. तेव्हा घराच्या हॉलमध्ये नातीच्या हातात सळई आणि तिच्या प्रियकराच्या हातात चाकू होता. जेव्हा नातवाने ओरडायला सुरुवात केली तर प्रियकराने मुलीच्या भावाचा गळा दाबला. आणि ते धक्के मारून पळून गेल्याचे मुलीच्या आजोबांनी तक्रारीत म्हटल्याचे हाथरसचे एएसपी अशोक कुमार सिंह यांनी हिन्दुस्थानशी बोलताना सांगितले. या हत्येनंतर अंगणातील आणि घरातील रक्ताचे डाग पाण्याने धु्ण्याचा प्रयत्न झाला आहे. पोलीसांच्या फोरेन्सिक टीमने रक्त आणि इतर नमूने जमा केले असल्याचे सिंह यांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.