काँग्रेसच्या नगरसेवकाला थेट तिहार जेलमधून धमकीचा फोन

विशेष म्हणजे या प्रकरणी विक्रांत चव्हाण यांनी ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांना अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे म्हटले आहे. तसेच तिहार तुरुंगामध्ये असलेल्या गुंडांकडून ही धमकी आल्याचा दावा विक्रांत चव्हाण यांनी केला. Congress corporator Vikrant Chavan

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jun 02, 2021 | 10:57 PM

ठाणे: कॉंग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण (Congress corporator Vikrant Chavan) यांनी अनधिकृत बांधकामांविरोधात आवाज उठवल्यामुळे धमकी मिळाल्याचा तक्रार अर्ज ठाणे पोलिसांकडे दिलाय. विशेष म्हणजे या प्रकरणी विक्रांत चव्हाण यांनी ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांना अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे म्हटले आहे. तसेच तिहार तुरुंगामध्ये असलेल्या गुंडांकडून ही धमकी आल्याचा दावा विक्रांत चव्हाण यांनी केला. (Threatening call to Congress corporator Vikrant Chavan directly from Tihar Jail)

ठाणे पोलिसांकडेही विक्रांत चव्हाण यांची तक्रार

या प्रकरणी ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाणे पोलिसांकडेही विक्रांत चव्हाण यांनी तक्रार केलीय. शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात तक्रार केल्याने आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड केल्यामुळे ही धमकी दिल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केलाय. ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत असल्याची तक्रार नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्याकडून सातत्याने होत आहे.

विक्रांत चव्हाण यांनी अनधिकृत बांधकामांवरून अधिकाऱ्यांना धरले धारेवर

गेल्या काही महिन्यांत झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये विक्रांत चव्हाण यांनी अनधिकृत बांधकामांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. कॉंग्रेसच्या माध्यमातून सातत्याने महापालिकेच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढल्यामुळे घाटकोपर येथील एका व्यक्तीने भेटण्यासाठी बोलवले. त्यावेळी ठाणे महापालिकेचा अधिकारी तेथे असल्याचा आणि त्यांच्या मार्फत फोनवरून तिहार जेलमधील अटक आरोपीने फोनवरून धमकावल्याचे विक्रांत चव्हाण यांनी म्हटले.

ठाणे शहरातील सर्व अनधिकृत बांधकामांविरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी

या प्रकरणी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना याची माहिती देण्यात आली. तसेच पोलीस प्रशासन आणि ठाणे महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आल्याचे विक्रांत चव्हाण यांनी स्पष्ट केले. ठाणे शहरातील सर्व अनधिकृत बांधकामांविरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच सहाय्यक आयुक्तांची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अन्यथा कॉंग्रेसच्या माध्यमातून व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विक्रांत चव्हाण यांनी यावेळी दिला.

संबंधित बातम्या

क्वारंटाईन सेंटरमधून 23 पंखे, नळाच्या तोट्या, बल्ब पळविले; चहा विकणाऱ्या भामट्याला बेड्या

नागपूरच्या रेल्वे पोलिसांकडून 2 लाखांचं ब्राऊन शुगर जप्त

Threatening call to Congress corporator Vikrant Chavan directly from Tihar Jail

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें