नागपूरच्या रेल्वे पोलिसांकडून 2 लाखांचं ब्राऊन शुगर जप्त

नागपूरच्या रेल्वे पोलिसांनीसुद्धा महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून ब्राऊन शुगर जप्त केलीय, एका बेवारस बॅगमध्ये या ड्रग्जच्या पुड्या बांधून ठेवण्यात आल्या होत्या. Nagpur Railway Police seizes brown sugar

नागपूरच्या रेल्वे पोलिसांकडून 2 लाखांचं ब्राऊन शुगर जप्त
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 10:43 PM

नागपूर: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यानं लॉकडाऊन लादण्यात आलाय. त्यामुळे अनेक सेवांवर निर्बंध लादण्यात आलेत. परंतु या काळात ड्रग्जची तस्करीही मोठ्या प्रमाणात वाढलीय. नागपूरच्या रेल्वे पोलिसांनीसुद्धा (Nagpur Railway Police) महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून ब्राऊन शुगर जप्त केलीय, एका बेवारस बॅगमध्ये या ड्रग्जच्या पुड्या बांधून ठेवण्यात आल्या होत्या. (Nagpur Railway Police seizes Rs 2 lakh worth of brown sugar)

त्या बॅगमध्ये ब्राऊन शुगरच्या 310 पुड्या

नागपूर रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्स्प्रेस गाडी पोहोचली असता नियमित पेट्रोलिंगवर असलेल्या रेल्वे पोलिसांना जनरल बोगीमध्ये एक बेवारस बॅग दिसली, त्या बॅगबद्दल विचारपूस केली असता कोणीही त्यावर आपला हक्क सांगितला नाही. त्यामुळे ती बॅग ताब्यात घेऊन चेक केली असता त्यात छोट्या छोट्या पुड्या दिसून आल्या. त्यानंतर त्याची माहिती अमली पदार्थ विरोधी विभागाला देण्यात आली असता ते ब्राऊन शुगर असल्याचं उघड झालं. त्या 310 पुड्यांमधील ब्राऊन शुगरचं 21.490 ग्रॅम वजन होतं, त्याची बाजारात किंमत 2 लाख 14 हजार 900 रुपये असल्याचा अंदाज आहे.

मादक पदार्थांची तस्करी केली जात असल्याने खळबळ

रेल्वेच्या मार्गाने अशा प्रकारे मादक पदार्थांची तस्करी केली जात असल्याने खळबळ माजलीय, मात्र ही बॅग कोणाची होती आणि कोण याची तस्करी करत होता याचा शोध आता रेल्वे पोलीस घेत आहेत.

नवी मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत ब्राऊन शुगर केली जप्त

गेल्या काही महिन्यांपूर्वीसुद्धा नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai police) धडक कारवाई करत ब्राऊन शुगर जप्त केली होती. अंमली पदार्थांची विक्री (Brown Sugar Drugs seized) करण्याऱ्या दोघांना नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. रुपये 5 लाख किमतीचे ब्राऊन शुगर अंमली पदार्थ त्यांच्याकडून जप्त करण्यात आले होते. वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सलीम रहमान इनामदार यांना 11 मार्च रोजी सुत्रांकडून वाशी सेक्टर 10 येथील श्रद्धा इमारती जवळ काही लोक अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजले होते. इनामदार यांनी सदर बाब आपल्या वरिष्ठांना सांगितली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सापळा रचला होता.

संबंधित बातम्या

अनुकंपा तत्त्वावर शिक्षिकेच्या नोकरीसाठी शरीरसुखाची मागणी, लातुरात अधिकाऱ्यावर गुन्हा

“आयुष्य मनासारखं जगता येत नसल्याची तक्रार”, नाशिकमध्ये नैराश्यग्रस्त आईचा दोन मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न

Nagpur Railway Police seizes Rs 2 lakh worth of brown sugar

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.