“आयुष्य मनासारखं जगता येत नसल्याची तक्रार”, नाशिकमध्ये नैराश्यग्रस्त आईचा दोन मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न

आयुष्य मनासारखं जगता येत नसल्याच्या नैराश्यातून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय.

"आयुष्य मनासारखं जगता येत नसल्याची तक्रार", नाशिकमध्ये नैराश्यग्रस्त आईचा दोन मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न


नाशिक : आयुष्य मनासारखं जगता येत नसल्याच्या नैराश्यातून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय. यात सोनल शहा या महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच त्यांची दोन मुलं सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. आज (12 मार्च) सकाळी उघडकीस आलेल्या घटनेनं एकच खळबळ उडालीय (Mother tried to suicide with two child in Nashik).

नाशिकमधील संबंधित महिलेच्या मनात आयुष्यात मनासारखं काही घडत नाही अशी भावना तयार झाली. या नैराश्यातून नाशिकच्या सिटी सेंटर मॉल परिसरात या महिलेने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडलीय. ही घटना नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उशाकिरण सोसायटीत घढली. या महिलेने स्वतः सह आपल्या दोन मुलांना मोठ्या प्रमाणात औषध पाजत जीवन संपविण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांना परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. मात्र, दुर्दैवाने या घटनेत सोनल शहा या महिलेचा मृत्यू झालाय. या महिलेचे दोन मुलं मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आत्महत्या केलेल्या महिलेच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्या करण्याचं कारण स्पष्ट करण्यात आलंय. असं असलं तरी पोलीस या प्रकरणाचा वेगवेगळ्या बाजूने तपास करत आहेत.

हेही वाचा :

भाऊजींचं उडवलेलं डोकं घेऊन मेहुणा पोलिस स्टेशनात, बहिणीचीही आत्महत्या

पतीनिधनानंतर शेजाऱ्याशी सूत जुळले, लग्नाला विरोधाची भीती, महिलेची प्रियकरासह आत्महत्या

बाळासाहेब थोरातांच्या बंगल्याच्या दालनात आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या प्रसंगावधानमुळे अनर्थ टळला

व्हिडीओ पाहा :

Mother tried to suicide with two child in Nashik

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI