AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची गोळी घालून हत्या; बाईकवरून जात असताना हल्ला

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून त्याला हिंसेचं गालबोट लागतानाही दिसत आहे. (tmc leader arjun Sonkar shot dead in west bengal)

तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची गोळी घालून हत्या; बाईकवरून जात असताना हल्ला
| Updated on: Jan 02, 2021 | 2:45 PM
Share

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून त्याला हिंसेचं गालबोट लागतानाही दिसत आहे. काल शुक्रवारी खडगपूर शहरातील मथुराकाटी येथे अज्ञात लोकांनी तृणमूलचे नेते अर्जुन सोनकर यांना गोळी घातली. बाईकवरून जात असताना सोनकर यांच्यावर गोळ्या घालण्यात आल्या. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोनकर यांना लगेचच खडगपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे जाण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (tmc leader arjun Sonkar shot dead in west bengal)

30 वर्षीय अर्जुन सोनकर हे खडगपूर जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे युवा नेते होते. सोनकर यांची हत्या राजकीय वादातून की जुन्या वादातून झालीय? याबाबतची कोणतीही माहिती मिळाली नसून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी सोनकर हे मथुराकाटी येथील बेबी राणी ग्राऊंडवरून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना गोळी घातली. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. सोनकर हे बाईकने जात असतानाच त्यांना गोळी घालण्यात आली. त्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यातच खाली कोसळले असता स्थानिकांनी सोनकर यांना तात्काळ उचलून संभाग रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांना मृत घोषित करण्यात आले.

काल दुपारी 3 वाजता सोनकर यांना एक फोन आला होता. त्यानंतर ते घरातून बाहेर पडले होते. संध्याकाळी त्यांची हत्याच झाल्याची बातमी आल्याचं सोनकर यांच्या कुटुंबानं म्हटलं आहे. तर, सोनकर यांची हत्या झाली त्या ठिकाणी पिस्तुलाच्या गोळीचा एक बॉक्स सापडला आहे. तृणमूलनेही सोनकर त्यांचे कार्यकर्ते असल्याचं स्पष्ट केलं आहे.

हावडातही तृणमूल कार्यकर्त्याची हत्या

29 डिसेंबर रोजी हावडा येथे तृणमूलच्या एका कार्यकर्त्याची गोळी झाडून हत्या झाली होती. धर्मेंद्र सिंह असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. मंगळवारी संध्याकाळी शालीमार येथील घरातून बी गार्डनकडे जात असताना काही बाईकस्वारांनी धर्मेंद्रच्या दिशेने पाच राऊंड गोळ्या झाडल्या होत्या. त्यात धर्मेंद्रचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. (tmc leader arjun Sonkar shot dead in west bengal)

संबंधित बातम्या:

सोलापुरात मौजमजेसाठी दुचाकी चोरी, 10 दुचाकींसह दोन अल्पवयीन मुलं ताब्यात

बाळ बोठेचा शोध आता परराज्यात घेणार? पोलिसांचा न्यायालयात अर्ज

साताऱ्यात जवानाची निर्घृण हत्या, मारहाणीत मृत्यूचा बनाव उघड, पत्नीसह भावजय अटकेत

(tmc leader arjun Sonkar shot dead in west bengal)

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...