AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरासमोर खेळता खेळता अचानक गायब झाली मुले, दोघा भावंडांसोबत नक्की काय घडले?

गुंजाळ यांची दोन्ही मुले बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी आली. त्यानंतर ती घराबाहेर खेळत होती. काही वेळाने आई मुलांना पहायला गेली असता मुले घराबाहेर दिसली नाहीत.

घरासमोर खेळता खेळता अचानक गायब झाली मुले, दोघा भावंडांसोबत नक्की काय घडले?
घराबाहेर खेळत असताना दोन मुले अचानक बेपत्ताImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Feb 17, 2023 | 3:21 PM
Share

सिन्नर / उमेश पारीक (प्रतिनिधी) : घराबाहेर खेळत असतानाचा दोन भावंडे अचानक गायब झाल्याची धक्कादाक घटना सिन्नर तालुक्यातील कानडी मळा परिसरात घडली आहे. मुलं घराबाहेर दिसली नाहीत म्हणून आई-वडिलांनी त्यांचा सर्वत्र शोध सुरु केला. मात्र मुलांचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. अखेर रात्री उशिरा सिन्नर पोलिसात मुले बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. दोन दिवस झाले तरी मुलांचा अद्याप शोध लागला नाही. मुलांचा शोध घेण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. दोन मुले अचानक गायब झाल्याने आई-वडिलांना दुःख अनावर झाले आहे.

आई-वडिल मोलमजुरीचे काम करतात

सिन्नर येथील कानडी मळा परिसरात सरला गुंजाळ आणि सदाशिव गुंजाळ हे दोघे आपल्या 12 वर्षाच्या आणि 11 वर्षाच्या दोन मुलांसह राहतात. दोघेही पती मोलमजुरीचे काम करुन कुटुंबाची उपजिवीका करतात.

घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाली

गुंजाळ यांची दोन्ही मुले बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी आली. त्यानंतर ती घराबाहेर खेळत होती. काही वेळाने आई मुलांना पहायला गेली असता मुले घराबाहेर दिसली नाहीत.

सिन्नर पोलीस ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याची तक्रार

आई आणि वडिलांनी आजूबाजूला मुलांचा शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत बराच शोध घेऊनही मुलांचा थांगपत्ता लागला नाही. अखेर आई-वडिलांनी सिन्नर पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच