5

Video : जालन्यात पोहायला गेलेली दोन मुलं बुडाली, चंद्रपुरात शेवाळवरुन घसरल्याने एकाचा मृत्यू

जालण्यात काल सायंकाळी दोन मुल बुडाल्याने अख्या गावावर शोककळा पसरली आहे.

Video : जालन्यात पोहायला गेलेली दोन मुलं बुडाली, चंद्रपुरात शेवाळवरुन घसरल्याने एकाचा मृत्यू
चंद्रपुरात शेवाळवरुन घसरल्याने एकाचा मृत्यूImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 10:08 AM

जालना – तलावात (Lake) पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना जालना (Jalna) तालुक्यातील बेथल येथे घडली. पावसामुळे तलाव भरल्याने ही दोन मुले आपल्या मित्रांसोबत या तलावात पोहायला गेली होती. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने या दोन मुलांचा या तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रात्री उशिरापर्यंत या मुलांचा पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध सुरू होता. तर दुसऱ्या घटनेमध्ये नाला पार करताना शेवाळामुळे पाय घसरून पडला एकजण पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. जो इसम पडला त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

दोन्ही घटनेतील मृतदेहाचे शोध काम सुरु

जालण्यात काल सायंकाळी दोन मुल बुडाल्याने अख्या गावावर शोककळा पसरली आहे. बुडालेल्या मुलाचा शोध घेण्यात रात्री बऱ्याच अडचणी येत होत्या. त्यांना रात्री उशिरापर्यंत शोधण्याचं काम सुरु होतं. दुसऱ्या घटनेतील इमसाचा देखील मृतदेह रात्री उशिरा शोधण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे दोन्ही घटनेतील मृतदेह शोधण्याचे काम सकाळी सुरु झाले आहे.

हे सुद्धा वाचा

यातील एकाला वाचविण्यात यश

चंद्रपूर जिल्ह्यात जुनोना तलाव परिसरात नाला पार करताना काही ग्रामस्थ रापट्यावर शेवाळ असल्याने पाण्याच्या प्रवाहासोबत नाल्यात पडले. मात्र त्यातील दोघे जलपर्णीमुळे अडकून पडले. यातील एकाला वाचविण्यात यश आले. मात्र दुसरा दुसऱ्याला वाचवता न आल्याने त्याचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यात रोज पाऊस बरसतो आहे. त्यातच आपल्या शेतीकडे हे तीन ग्रामस्थ निघाले होते. नाल्याच्या कच्च्या रपट्यावर शेवाळ असल्याने त्यातील एक घसरून प्रवाहात पडला. अन्य दोघांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या दरम्यान दुसराही वाहू लागला. त्याला कसेबसे वर काढले मात्र त्यापैकी एकाला वाचविण्यात अपयश आले. हा सर्व व्हिडिओ आता पुढे आला असून नंदलाल कैथवास (संतोषी वॉर्ड, बल्लारपूर) असे या बुडालेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती पुढे आली आहे. ग्रामस्थांनी संध्याकाळी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र अंधार पडल्याने त्यात यश आले नाही. आज सकाळी जिल्हा आपत्ती दलाच्या जवानांच्या मदतीने त्याला शोधले जाणार आहे. त्यासाठी जेसीबी घेऊन एक पथक रवाना झाले आहे. मात्र जीवन आणि मृत्यू या मधला संघर्षाचा हा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे.

Non Stop LIVE Update
प्रसाद लाड यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य
प्रसाद लाड यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य
'विजय वडेट्टीवार आहे तरी कोण?', भाजपच्या बड्या नेत्याचा थेट सवाल
'विजय वडेट्टीवार आहे तरी कोण?', भाजपच्या बड्या नेत्याचा थेट सवाल
उल्हासनगरच्या सेंच्युरीत भीषण स्फोट, काय कारण अन् किती कामगार दगावले?
उल्हासनगरच्या सेंच्युरीत भीषण स्फोट, काय कारण अन् किती कामगार दगावले?
नागपुरात मुसळधार पावसाचं थैमान, नाग नदीवरील पूल कोसळला अन्...
नागपुरात मुसळधार पावसाचं थैमान, नाग नदीवरील पूल कोसळला अन्...
विजय वडेट्टीवारांची शिवसेनेतील अपात्र आमदारांसंदर्भात मोठी मागणी काय?
विजय वडेट्टीवारांची शिवसेनेतील अपात्र आमदारांसंदर्भात मोठी मागणी काय?
'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी आलेल्या तरूणीला मंडपातच भोवळ अन्...
'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी आलेल्या तरूणीला मंडपातच भोवळ अन्...
येत्या ४८ तासात मॉन्सून होणार सक्रिय, राज्यात कुठं कोसळणार मुसळधार?
येत्या ४८ तासात मॉन्सून होणार सक्रिय, राज्यात कुठं कोसळणार मुसळधार?
भंडाऱ्यातील 34 वर्ष जुन्या ऐतिहासिक शिवमंदिरातील पिंड पाण्याखाली अन्..
भंडाऱ्यातील 34 वर्ष जुन्या ऐतिहासिक शिवमंदिरातील पिंड पाण्याखाली अन्..
बाप्पासाठी कायपण ! चक्क २०० किलो टॉमेटोनं केली बाप्पाकरता सजावट
बाप्पासाठी कायपण ! चक्क २०० किलो टॉमेटोनं केली बाप्पाकरता सजावट
विदर्भात पावसाचा कहर, नागपुरात झालेली अशी ढगफुटी तुम्ही कधी पाहिली?
विदर्भात पावसाचा कहर, नागपुरात झालेली अशी ढगफुटी तुम्ही कधी पाहिली?