गुरुंनीच केला घात! शिक्षकांनी विद्यार्थिनीला वाढदिवसाला घरी बोलावलं अन्…., चंद्रपुरात तणाव, उद्या बंदची हाक

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात 2 शिक्षकांनी 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित विद्यार्थिनी इयत्ता अकरावीत शिक्षण घेत आहे.

गुरुंनीच केला घात! शिक्षकांनी विद्यार्थिनीला वाढदिवसाला घरी बोलावलं अन्…., चंद्रपुरात तणाव, उद्या बंदची हाक
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात 2 शिक्षकांनी 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 7:34 PM

महाराष्ट्रात महिला आणि मुलींच्या सुरक्षेवर कितीवेळा प्रश्न उपस्थित करायचा? असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. महाराष्ट्रात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत आहे. विशेष म्हणजे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना आज समोर आली आहे. याआधीदेखील तशा घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बदलापुरातील शाळेतील घटनेनं राज्य हादरलं होतं. तसेच नाशिकमध्ये एका निवृत्त मुख्याध्यापकाकडून सरकारी कार्यालयात महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला गेल्याची घटना समोर आली. यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात असाच संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे वरारो शहर हादरलं आहे. या घनेच्या निषेधार्थ उद्या वरोरा शहर बंदची हाक देण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात 2 शिक्षकांनी 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित विद्यार्थिनी इयत्ता अकरावीत शिक्षण घेत आहे. प्रमोद बेलेकर आणि धनंजय पारखे अशी आरोपी शिक्षकांची नावं आहेत. आपल्या वाढदिवसाचं निमित्त करून या विद्यार्थिनीला शिक्षकांनी आपल्या रूमवर बोलावलं होतं. वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून या आरोपी शिक्षकांनी तिच्याकडे मिठीची मागणी केली. तिने घाबरून पळ काढण्याचा प्रयत्न करतात बळजबरी करण्यात आली.

भीतीने पळून आलेल्या पीडित मुलीने पालकांना याची माहिती दिली. यानंतर पीडितेच्या पोलिसांनी वरोरा पोलीस ठाणे गाठत तक्रार केली. वरोरा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकांच्या विरोधात पॉक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी दोन्ही शिक्षक फरार झाले आहेत.

वरोरा शहरातील विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष या घटनेनंतर आक्रमक झाले आहेत. त्यांनी शिक्षकांच्या निलंबनाची मागणी केली आहे. मनसे, भाजप, बजरंग दल या पक्ष आणि संघटनांनी या घटनेविरोधात आंदोलन करून आरोपी शिक्षकांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. याच प्रकरणावरुन 31 ऑगस्टला वरोरा बंदची हाक देण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....