AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजस्थानात पतीची कंपनी, पाच कोटींचा टर्नओव्हर, तरीही दीरावर जीव भाळला, सुपारी देऊन पतीचाच काटा काढला

राजस्थानच्या उदयपूर शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचे तिच्या मोठ्या दीराशी अनैतिक संबंध होते. याच संबंधातून तिने आपल्या पतीची हत्या केली (Udaypur woman murder her husband due to love afair with brother in law).

राजस्थानात पतीची कंपनी, पाच कोटींचा टर्नओव्हर, तरीही दीरावर जीव भाळला, सुपारी देऊन पतीचाच काटा काढला
सांकेतिक फोटो
| Updated on: Apr 10, 2021 | 4:14 PM
Share

जयपूर : राजस्थानच्या उदयपूर शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचे तिच्या मोठ्या दीराशी अनैतिक संबंध होते. याच संबंधातून तिने आपल्या पतीची हत्या केली. या कामात तिला तिच्या दीराने देखील साथ दिली. विशेष म्हणजे तिच्या पतीची राजस्थानात स्वत:ची कंपनी होती. या कंपनीचा वर्षाचा टर्नओव्हर हा पाच कोटींचा होता. मात्र, मोठ्या दीराच्या प्रेमात पडल्याने तिने आपल्याच पतीची हत्या केली. पोलिसांनी तिच्या पतीच्या मृत्यूनंतर पाच महिन्यांनी या हत्येचा उलगडा केला (Udaypur woman murder her husband due to love afair with brother in law).

पोलिसांकडून आरोपींना अटक

संबंधित घटना ही उदयपूर शहरातील प्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. पाच महिन्यांपूर्वी पोलिसांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. मात्र, त्याची ओळख पटली नव्हती. अखेर पाच महिन्यांनी पोलिसांनी हत्येचं गूढ उकललं आहे. एसपी डॉ. राजीव पचार यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. या प्रकरणातील दोषी पत्नी, तिचा दीर आणि इतर चार आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पोलिसांनी तपास कसा केला?

काही लोक एका व्यक्तीचं मृत्यूपत्र बनवण्यासाठी वेगवेगळ्या ग्रामपंचायतींकडे जावून याबाबत विनंती करत होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांच्या स्पेशल टीमने सापळा रचून नेमकं प्रकरण काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका मृतकाचं खोटं मृत्यूपत्र बनवण्याबाबतचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. याशिवाय आपल्यासोबत आणखी तीन जण या गुन्ह्यात सामील होते, असा कबुलीजबाब त्यांनी पोलिसांना दिला. आरोपींनी मृतकाची हत्या करण्यासाठी त्रिपुराच्या प्रदीपदास नावाच्या व्यक्तीला सुपारी दिल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी आरोपींनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या ऐकूण पोलिसांनाही धक्का बसला.

मृतकाची पत्नी आणि भाऊ तपनदास यांना अटक

पोलिसांनी या प्रकरणाची मास्टरमाईंड मृतकाची पत्नी आणि मृतकाचा भाऊ तपनदास यांना अटक केली. हे दोघं अनैतिक संबंधात होते, अशी माहिती तपासात समोर आली. विशेष म्हणजे आरोपींनी मृतकाची हत्या करुन त्याचा कोरोनाने मृत्यू झाला, असं गावी सांगितलं. त्यानंतर आरोपी गावी गेले. त्यांनी मृतकाचे सर्व क्रियाकर्म केले (Udaypur woman murder her husband due to love afair with brother in law).

आरोपींनी आधी पार्टी केली, नंतर हत्या

मृतक व्यक्ती उत्तमदास यांचा कंस्ट्रक्शनशी संबंधित व्यवसाय होता. त्यांची एक कंपनी होती. त्यांच्या कंपनीत इतर पाच आरोपी देखील काम करायचे. या पाचही आरोपींना हाताशी घेऊन उत्तमदास यांच्या पत्नीने त्यांचीच हत्या केली. यासाठी 12 लाखांची खंडनी देण्यात आली होती. आरोपींनी आधी उत्तमदास यांच्यासोबत मद्यपानाची पार्टी केली. त्यानंतर त्यांनी गळा घोटून हत्या केली. आरोपींनी उत्तमदास यांचा मृतदेह एका तलावाच्या किनाऱ्यावर फेकून दिला. उत्तमदास यांच्या मृत्यूनंतर त्यांची सर्व संपत्ती आपल्या नावावर करण्यासाठी आरोपी पत्नीचा प्रयत्न सुरु होता. मात्र, त्यासाठी मृत्यूपत्र गरजेचं होतं. याचसाठी ती बनावट मृत्यूपत्र बनवण्याच्या तयारीत होती. अखेर पोलिसांना या गोष्टीचा सुगावा लागला आणि हत्येचा उलगडा झाला.

हेही वाचा : लग्न ठरलं पण मुलगी पसंत नाही, तरुणाने स्वत:च्या होणाऱ्या नवरीसोबत जे कृत्य केलं त्याने बिहार हादरलं

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.