Chhota Rajan : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूचं वृत्त चुकीचं, एम्सचं स्पष्टीकरण

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त चुकीचं असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत, असं स्पष्टीकरण दिल्लीतील AIIMS रुग्णालयाने दिलं आहे.  (Chhota Rajan COVID-19)

Chhota Rajan : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूचं वृत्त चुकीचं, एम्सचं स्पष्टीकरण
Chhota-Rajan
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 5:09 PM

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त चुकीचं असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत, असं स्पष्टीकरण दिल्लीतील AIIMS रुग्णालयाने दिलं आहे.  (Chhota Rajan COVID-19). अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन (Chhota Rajan) याला कोरोनाची लागण झाली होती. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना छोटा राजनचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला 27 एप्रिलला उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज त्याचं निधन झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. पण छोटा राजन जिवंत असल्याची माहिती AIIMS ने दिलं आहे.

तब्बल 26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकणी गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जानेवारी महिन्यात ही शिक्षा सुनावली होती.

छोटा राजन कोण आहे?

छोटा राजन ऊर्फ नाना, याचं खरं नाव राजन सदाशिव निकाळजे असं आहे. तो सुरुवातीला अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्ब हल्ल्याचा आरोपी दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार होता. मात्र, कालांतराने दोघांमध्ये टोकाचं शत्रूत्व निर्माण झालं.

छोटा राजनने मुंबईतील एका चित्रपटगृहाबाहेर ब्लॅक तिकीट विकण्याचं काम सुरु केलं. त्यानंतर त्याची भेट राजन नायर ऊर्फ बडा राजन याच्याशी भेट झाली. बडा राजनकडून त्याने चुकीच्या आणि गुन्हेगारीच्या अनेक गोष्टी शिकल्या. येथूनच त्याच्या गुन्हेगारी विश्वातील कट-कारस्थानाला सुरुवात झाली. तो दारुची तस्करी करु लागला. बडा राजनच्या मृत्यूनंतर गुन्हेगारी विश्वात तो छोटा राजन म्हणून नावरुपाला आला. त्याच्यावर खंडनी, हत्येची, तस्करीचे अनेक मोठमोठे आरोप आहेत. सध्या तो जेलमध्ये शिक्षा भोगतोय.

छोटा राजन विरोधात 17 हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हेल दाखल आहेत. तो कित्येक वर्षांपासून फरार होता. मात्र, 2015 साली त्याला इंडोनेशियातून अटक करण्यात आली.

कोणत्या प्रकरणात छोटा राजनला शिक्षा

पनवेल येथील एक बिल्डर नंदू वाजेकर यांनी पुण्यात एक जागा डेव्हलपमेंट करण्यासाठी घेतली होती. ही जागा वाजेकर याला परमानंद ठक्कर या एजंट ने दिली होती. या बदल्यात वाजेकर याने परमानंद याला दोन कोटी रुपये दिले होते. मात्र, यानंतर ही आपला व्यवहार पूर्ण झाला नसल्याचं कारण पुढे करत परमानंद याने पैसे मागायला सुरुवात केली होती. जास्त पैसे मिळावे म्हणून परमानंद ठक्कर याने या व्यवहारात गँगस्टर छोटा राजन याला मध्यस्थी करायला सांगितली होती. त्यामुळे छोटा राजन याने बिल्डर वाजेकर याला फोन करून धमकावलं होत आणि प्रकरण मिटवायला सांगितलं होतं. यामुळे अखेर वाजेकर याने पोलिसात तक्रार दाखल केली होती. 2015 सालातील हे प्रकरण आहे.

या प्रकरणात छोटा राजन सोबत त्याच्या इतर तीन साथीदारांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे. छोटा राजन याच्यासह सुरेश शिंदे, सुमित म्हात्रे आणि अशोक निकम यांनाही दोन वर्षे शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड अशी ही शिक्षा सुनावली आहे. पाच हजार रुपये न भरल्यास त्याबदल्यात सश्रम कारावासात वाढ होणार आहे.

71 खटले प्रलंबित

या प्रकरणात मोक्का कायदा आणि खंडणीसाठी धमकावणे, ट्रेस पासिंग बाबत कलम लावण्यात आली होती. मात्र, राजन याच्या विरोधात मोक्का अॅक्ट सिद्ध झाला नाही. केवळ खंडणीच्या उद्देशाने धमकावणे हेच सिद्ध झाल्याने त्याला दोन वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे. छोटा राजन याच्या विरोधात सुमारे 71 खटले प्रलंबित आहेत. त्यापैकी आतापर्यंत चार गुन्ह्यांचा निकाल लागला आहे आणि या चारही गुन्ह्यात छोटा राजन याला दोषी ठरवून त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. छोटा राजन याला आतापर्यंत सुनावण्यात आलेल्या शिक्षा अशा आहेत…

1) पत्रकार जे. डे. प्रकरण – जन्मठेप 2) दिल्ली एथिक बोगस पासपोर्ट प्रकरण – दोन वर्षे 3) बी. आर. शेट्टी फायरिंग केस – 10 वर्ष शिक्षा 4) बिल्डर वाजेकर खंडणी केस- दोन वर्षे शिक्षा.

संबंधित बातम्या : 

Chhota Rajan | अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला तिहार तुरुंगात कोरोना, ‘एम्स’मध्ये दाखल

26 कोटींची खंडणी मागितली; गँगस्टर छोटा राजनला दोन वर्षाची शिक्षा

तिहार जेलमध्ये छोटा राजनने तोंड उघडण्याची पवारांना भीती: आंबेडकर

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.