AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीवंत आहे दाऊद इब्राहिमचा कर्दन ‘काळ’, 9 वर्षानंतर कसा दिसतो छोटा राजन? फोटो आलेत समोर

Chhota Rajan : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा कर्दनकाळ छोटा राजन याची आता आताची काही छायाचित्र समोर आली आहेत. वर्ष 2015 मध्ये छोटा राजनला भारतीय गुप्तहेर संघटनांनी परदेशात पकडले होते आणि नंतर त्याला भारतात आणण्यात आले. आता कसा दिसतो राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन?

जीवंत आहे दाऊद इब्राहिमचा कर्दन 'काळ', 9 वर्षानंतर कसा दिसतो छोटा राजन? फोटो आलेत समोर
दाऊदचा कट्टर शत्रू छोटा राजन आता दिसतो तरी कसा
| Updated on: Apr 21, 2024 | 2:41 PM
Share

दाऊद इब्राहिमचा कधी काळी विश्वासू सहकारी ते त्याचा हाडवैरी असा राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनचा प्रवास आहे. तो सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. त्याची आताआताची काही छायाचित्र या निमित्ताने समोर आली आहे. वर्ष वर्ष 2015 मध्ये छोटा राजनला भारतीय गुप्तहेर संघटनांनी परदेशात अटक केली होती. त्यानंतर त्याला भारतात आणलं गेलं. त्याची अनेक छायाचित्र इंटरनेटवर आहेत. आता दिल्लीत त्याच्यावर उपचार झाल्यानंतर त्यावेळची काही फोटो समोर आली आहेत.

तिहारच्या जेल क्रमांक-2 मध्ये मुक्काम

त्याची हल्लीची जी म्हणून छायाचित्र समोर आली आहेत. ती पण चार वर्षांपूर्वीची म्हणजे 2020 मधील आहेत. कोरोना लाटेत छोटा राजनला पण प्रसाद मिळाला होता. कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाल्याची अफवा उडाली होती. त्याला तातडीने उपचारासाठी दिल्लीतील अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्थेत (AIMS) भरती करण्यात आलं होते. त्यावेळी अँम्ब्युलन्स व्हॅनमधील आणि उपचारादरम्यानची त्याची छायाचित्र आता समोर आली आहेत. सध्या तो तिहार तुरुंगात क्रमांक 2 च्या बरॅकीत आहे.

अँम्ब्युलन्समधील छोटा राजनचा फोटो

दाऊदच्या नेहमी रडारवर

एक काळ असा होता की, राजेंद्र सदाशिव निकाळजे हा त्याचा गुरु मोठा राजन याच्या खूनानंतर दाऊदच्या गँगमध्ये सहभागी झाला. तो दाऊद इब्राहिमचा जणू उजवा हात होता. तो दुबई आणि इतर देशातून दाऊदचा कारभार सांभाळत होता. दोन दशके छोटा राजन दाऊद टोळीत होता. 1993 साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले. त्यानंतर छोटा राजनने देशभक्त गुंड म्हणून दाऊदपासून फारकत घेतली. त्यानंतर या दोघांमध्ये टोळी युद्ध रंगले. त्यात मुंबई, दुबई, नेपाळपर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला. दाऊदचा खास माणूस छोटा शकील आजही छोटा राजनला मारण्यासाठी टपलेला आहे. त्याने अनेकदा छोटा राजनला मारण्याची धमकी दिलेली आहे.

एम्स रुग्णालयात उपचार सुरु असताना

असा पकडला गेला छोटा राजन

  • छोटा राजन याला 25 ऑक्टोबर 2015 रोजी इंडोनेशियातील बाली शहरात अटक करण्यात आली होती. छोटा राजनला एक फोन कॉल त्यावेळी महागात पडला होता. नेहमी VOIP तो कॉल करायचा. पण 24 ऑक्टोबर 2015 रोजी WhatsApp वर त्याने त्याच्या हितचिंतकाला फोन केला होता. हा कॉल सुरक्षा यंत्रणांनी टॅप केला.
  • आता ऑस्ट्रेलिया सुरक्षित राहिले नसल्याचे आणि लवकरच येथून बाहेर पडणार असल्याचे छोटा राजन याने हितचिंतकाला सांगितले. सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या. त्यांनी राजन देश सोडत असल्याची माहिती इंटरपोलला दिली. 25 ऑक्टोबर 2015 रोजी ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांनी एक भारतीय प्रवाशी बाली या शहरासाठी निघाल्याची माहिती दिली. याची माहिती तात्काळ इंटरपोलला देण्यात आली. चक्रे फिरली आणि छोटा राजन बाली विमानतळावर पोहचताच त्याला अटक करण्यात आली. त्यावेळी दाऊद इब्राहिम आपल्या मागावर असल्याची कबुली त्याने दिली होती.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.