उल्हासनगरमध्ये थरार ! पैशाच्या वादातून आधी दोघांवर हल्ला, पोलिसांवरही चाकूने वार, आरोपी फरार

पैशांच्या व्यवहारावरून दोघांना मारहाण सुरू असताना भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावरच चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेतायत.

उल्हासनगरमध्ये थरार ! पैशाच्या वादातून आधी दोघांवर हल्ला, पोलिसांवरही चाकूने वार, आरोपी फरार
ULHASNAGAR
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 3:37 PM

ठाणे : पैशांच्या व्यवहारावरून दोघांना मारहाण सुरू असताना भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावरच चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेतायत.

पोलिसांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला 

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील सेक्शन 30 मध्ये 15 ऑक्टोबर रोजी रात्री 1 वाजता 3 जण मिळून अविनाश नायडू आणि संजय शितलानी या दोघांना मारहाण करत होते. याच वेळी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश डमाले आणि गणेश राठोड हे दोघे गस्त घालत असताना तिथे पोहोचले. काही व्यक्ती दोन जणांना चाकूने मारत असल्याचं पाहून दोघांनीही भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी हल्लेखोर नरेश लेफ्टी, ओमी आणि शशी चिकना उर्फ सुखी या तिघांनी अविनाश नायडू आणि संजय शितलानी यांना सोडून पोलिसांवरच हल्ला चढवला. यात पोलीस कर्मचारी गणेश डमाले यांच्या गालावर वार झाल्यानं त्यांचा जबडा फाटला.

दोन्ही पोलीस कर्मचारी जखमी 

हा प्रकार घडला त्यावेळी दोन्ही पोलीस कर्मचारी साध्या वेशात होते. त्यामुळे त्यांच्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला. मात्र जखमी झालेले पोलीस असल्याचं समजताच हल्लेखोर तेथून पळून गेले. या भांडणात गणेश डमाले हे पोलीस कर्मचारी तर जखमी झाले. पण अविनाश नायडू आणि संजय शितलानी हे दोघेही गंभीर स्वरूपात जखमी झाल्यानं त्यांना थेट मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

आरोपी फरार, शोध सुरु

पोलीस कर्मचारी गणेश डमाले यांना कल्याणच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या हल्ल्यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी हल्लेखोर नरेश लेफ्टी, ओमी आणि शशी चिकना उर्फ सुखी या तिघांविरोधात हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणत गंभीर स्वरूपाची दुखापत करणे असे गुन्हे दाखल केले आहेत. या हल्ल्यानंतर तिन्ही हल्लेखोर फरार असून पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी 4 पथकं रवाना केले आहेत. उल्हासनगर परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी ही माहिती दिलीय.

इतर बातम्या :

कोण गरळ ओकतंय हे काल पंकजा मुंडेंनीच सांगितलं; अरविंद सावंत यांचा फडणवीसांना टोला

रुम साफ करण्याचे हजार रुपये देतो सांगत हॉटेलमध्ये नेलं, नंतर सहा नराधमांकडून संतापजनक कृत्य

तारीख पे तारीख ! सोनियाच अध्यक्ष रहाणार, नव्या काँग्रेस अध्यक्षासाठी नवी

(unknown three accused attack on two police in ulhasnagar)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.