नवरा सीमेवर तैनात, इकडं बायकोचे अश्लील फोटो.., नराधमांचं चीड आणणारं कृत्य; नेमकं काय घडलं?
बरेलीच्या एसएसपी अनुराग आर्य यांच्याकडे या प्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

देशाच्या रक्षणासाठी जवान आपलं घर-दार सोडून सीमेवर पहारा देत असतो. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता तो शत्रूंना तोंड देतो. मात्र उत्तर प्रदेशमधील अशाच एका जवानाच्या पत्नीसोबत गंभीर प्रकार घडला आहे. या जवानाच्या पत्नीला तेथील गुंड प्रवृत्तीच्या स्थानिकांनी ब्लॅकमेल केलंय. या दोघांनी महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. ही घटना समोर आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना उत्तर प्रदेशमधील बरेली येथील आहे. पीडित महिलेचा पती जैसलमेर बॉर्डवर तैनात आहे. या जवानाच्या पत्नीला दोघांकडून ब्लॅकमेल केलं जात असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे ब्लॅकमेल करून या दोघांनी एक लाख रुपये वसूल केले आहेत. त्यानंतर आता या महिलेकडे आणखी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. हा छळ सहन करण्यापलीकडे गेल्यानंतर या महिलेने थेट पोलिसांत धाव घेतली. पोलीस तक्रारीनंतर हे सर्व प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे आरोपींनी महिलेच्या मुलीचेही अहरण करण्याची धमकी दिली होती.
पती जैसलमेर सीमेवर तैनात
बरेलीच्या एसएसपी अनुराग आर्य यांच्याकडे या प्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. दाखल तक्रारीनुसार पीडित महिला ही बाादरी पोलीस ठाणे क्षेत्रात फाईक इंक्लेव्ह परिसरात राहते. या महिलेचा पती भारतीय सेनेत आहे. सध्या ते राजस्थानमधील जैसलमेर येथील सीमेवर तैनात आहेत. ही महिला आपल्या मुलीसह बरेली येथे राहते. याच काळात दोन स्थानिक युवकांकडून या महिलेला त्रास देण्यात येतोय.
एकूण एक लाख वसूल केले
सद्दाम हुसैन आणि खतीम अली अशी आरोपींची नावे असून ते इज्जतनगरात राहतात. पीडित महिलेच्या आक्षेपार्ह फोटोंचा वापर करून आरोपींकडून संबंधित महिलेला ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचा आरोप आहे. अगोदर या आरोपींनी धमकी देऊन 50-50 हजार रुपये दोन वेळा घेऊन एकूण एक लाख रुपये वसूल केले. आता हेच आरोप आणखी दोन लाख रुपयांची मागणी करत आहेत. आरोपींकडून सोशल मीडियावर महिलेचे आक्षेपार्ह फोटो टाकले जात आहेत. या फोटोंवर अश्लील कमेंट्स केल्या जात आहेत. तसेच बदनाम करण्याचाही धमकी या महिलेला दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या आरोपींकडून पीडित महिलेच्या मुलीचे अपहरण करण्याचीही धमकी दिली जात आहे. या प्रकरणी आता तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सध्या या आरोपींचा शोध चालू आहे.
