Saas damad love story : जावयाच्या प्रेमात अपनादेवी इतकी बुडालीय की, पोलिसांना म्हणाली, ‘मी त्याच्यासोबत…’
Saas Damad Latest Update : जावयासोबत पळून गेलेली अपनादेवी पोलिसांच्या अटकेत आहे. दोघांनी पोलिसांसमोर अनेक खुलासे केले आहेत. जावई राहुलबद्दल तिने अनेक गोष्टी सांगितल्या? ते दोघे का इतके जवळ आले? ते सुद्धा कारण तिने सांगितलं. पुढची प्लानिंग काय आहे? ते सुद्धा सासू अपना देवीने सांगितलं.

अलीगढच्या बहुचर्चित सासू-जावई लव्ह स्टोरीमध्ये पोलिसांचा तपास अजूनही सुरु आहे. जावई राहुल सध्या मडराक पोलीस ठाण्यात आहे, तेच सासू अपना देवीला वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. दोघांची वेगवेगळी चौकशी सुरु आहे. त्यांचं एवढच म्हणणं आहे की, त्यांनी काही चुकीच केलेलं नाही. त्या दोघांना परस्परांसोबत लग्न करायचं आहे. आयुष्यभर एकत्र रहायचं आहे. या दरम्यान सासू अपना देवीने पुढचं प्लानिंग सांगितलं.
मछरिया गावचा निवासी राहुल कुमारच लग्न मडराक येथे राहणाऱ्या शिवानी सोबत ठरलं होतं. 16 एप्रिल म्हणजे काल हे लग्न होणार होतं. पण त्याआधीच 6 एप्रिलला राहुल होणाऱ्या सासूसोबत पळून गेला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच दोन्ही कुटुंबांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांच्या तीन टीम्स त्यांचा शोध घेत होत्या. 10 दिवसानंतर दोघांनी दादो पोलीस ठाण्यात सरेंडर केलं. कारण पोलिसांना त्यांचं लोकेशन समजलं होतं.
त्यांची चौकशी सुरु
राहुलच लग्न होणार होतं, त्याचदिवशी त्याला अटक करण्यात आली. दादो पोलीस ठाण्यात येऊन मडराक पोलीस दोघांना आपल्यासोबत घेऊन गेले. त्यांची चौकशी सुरु आहे. आज 17 एप्रिलला दोन्ही कुटुंबांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं होतं. पण अजूनपर्यंत अपना देवीच्या घरातून कोणी पोलीस ठाण्यात आलेलं नाही. राहुलकडूनही कोणी पोलीस ठाण्यात आलेलं नाही.
घटस्फोटाशिवाय लग्न कसं होईल? अपनादेवी म्हणाली
अपना देवीला जेव्हा पोलिसांनी विचारलं की, जितेंद्रला घटस्फोट दिल्याशिवाय तुमचं लग्न मान्य होणार नाही. त्यावर ती म्हणाला की, “राहुलशी माझं लग्न झालं नाही, तरी मी त्याच्यासोबतच राहीन. आम्ही आधीच सर्व प्लानिंग केलीय. जिथेही राहणार तिथे सोबत राहणार” जावई राहुल सुद्धा सासूसोबत लग्न करायला तयार आहे.
सासूवर वाईट नजर का टाकली?
मी अपना देवीसोबत जरुर लग्न करणार. फक्त अट इतकीच आहे की, ती त्यासाठी तयार असलं पाहिजे. राहुलला जेव्हा पोलिसांनी विचारलं की, सासूवर तुझी नियत का फिरली? त्यावर तो म्हणाला की, “माझी काही नियत बदलली नाही. हिचे कुटुंबीय तिला त्रास देत होते. मी फक्त सहकारी बनून मदत करण्याचा प्रयत्न केला. मी यांना आपली पत्नी बनवायला तयार आहे”
