AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडच्या आयुष्यातील अशी एक गोष्टी समजली की आधी तो डिप्रेशनमध्ये गेला, नंतर एक दिवस….

मुलगा-मुलगी दोघेही सुरुवातीच्या दिवसात परस्परांना समजून घेतल्यानंतर लग्नाचा उद्देश ठेवतात. पण तेच नशिबवान असतात, ज्यांच हे स्वप्न सत्यात उतरतं.

बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडच्या आयुष्यातील अशी एक गोष्टी समजली की आधी तो डिप्रेशनमध्ये गेला, नंतर एक दिवस....
| Updated on: Jul 30, 2025 | 2:13 PM
Share

प्रेमात पडल्यानंतर अनेक जण लग्नाची स्वप्न बघतात. मुलगा-मुलगी दोघेही सुरुवातीच्या दिवसात परस्परांना समजून घेतल्यानंतर लग्नाचा उद्देश ठेवतात. पण तेच नशिबवान असतात, ज्यांच हे स्वप्न सत्यात उतरतं. प्रत्येकजण इतका नशिबवान नसतो. प्रेमात यश मिळालं नाही, तर आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. काहीजण आपल्या जुन्या प्रेम संबंधातून कधीच बाहेर येत नाहीत. शेवटी, शेवटी ते टोकाचं पाऊल उचलतात. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरात असच काहीस झालं. तिथे एका युवकाने विष पिऊन आपलं आयुष्य संपवलं. असं यासाठी कारण त्याला गर्लफ्रेंडच असं एक सिक्रेट समजलं, ज्याचा धक्का त्याला पचवता आला नाही.

पहासू पोलीस ठाणे क्षेत्रात येणाऱ्या फजलपूर गावचा विषय आहे. 22 वर्षाच्या अरुणने घरातच विषारी पदार्थ प्राशन केला. त्यामुळे त्याची तब्येत बिघडली. तडकाफडकी नातेवाईक अरुणला रुग्णालयात घेऊन गेले. त्याची गंभीर स्थिती लक्षात घेऊन युवकाला हायर सेंटरमध्ये रेफर करण्यात आलं. उपचारादरम्यान अरुणचा मृत्यू झाला. मृतक पॉलिटेक्निक करुन कासिमपूर पावर हाऊसमध्ये अप्रेंटिस शिप करत होता. त्याच्या मृत्यूमुळे नातेवाईकांची रडून, रडून वाईट अवस्था आहे. या प्रकरणात कुठलीही तक्रार दिलेली नाही.

पण तो नेहमी उदास असायचा

वडिल देवदत्त यांनी सांगितलं की, शेजारच्या गावात राहणाऱ्या युवतीसोबत अरुणचे प्रेमसंबंध होते. युवतीच दुसऱ्याठिकाणी लग्न ठरलेलं. त्यामुळे अरुण डिप्रेशनमध्ये गेला. आम्ही त्याला समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण तो नेहमी उदास असायचा. अरुणच्या डोक्यात काय चाललेलं? हे मला माहित नाही. गर्लफ्रेंडच लग्न ठरल्याने तो आतून कोसळून गेलेला. त्याने विष पिऊन जीवन संपवलं. अलीगढच्या वरुण रुग्णालयात उपचारादरम्यान अरुणचा मृत्यू झाला.

अजूनपर्यंत कुठलीही तक्रार दिलेली नाही

मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. सीओ मधुप कुमार सिंह यांनी सांगितलं की, मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. अजूनपर्यंत कुठलीही तक्रार दिलेली नाही. तक्रारीच्या आधारावर कारवाई केली जाईल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.