23 वर्षाच्या मुलीच्या नजरेत भरला 15 वर्षाचा मुलगा, दोघांनी मंदिरात लग्न केलं, पण…
प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. पण प्रेमात पडल्यानंतर माणसाने काही गोष्टींच भान जरुर बाळगल पाहिजे. समाजाच्या दृष्टीकोनातून सोडा, पण आपल्या सुखी जीवनाची वाट लागते.असच एक प्रकरण समोर आलय.

प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. पण प्रेमात पडल्यानंतर माणसाने काही गोष्टींच भान जरुर बाळगल पाहिजे. समाजाच्या दृष्टीकोनातून सोडा, पण आपल्या सुखी जीवनाची वाट लागते.असच एक प्रकरण समोर आलय. एका 23 वर्षाच्या युवतीवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. तिच्यावर आरोप आहे की, तिने 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. तिने या मुलासोबत शारीरिक संबंध ठेऊन त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला. मुलाने नकार दिल्यानंतर तिने विष प्राशन करुन जीवन संपवण्याची धमकी दिली. मग, घाबरलेल्या युवकाने युवतीसोबत 27 ऑगस्ट रोजी मंदिरात लग्न केलं. उत्तर प्रदेशच्या देवरियामधील हे प्रकरण आहे.
मुलीने मुलावर दबाव टाकला. त्याला चिथवलं नंतर मंदिरात जाऊन त्याच्याशी लग्न केलं. अल्पवयीन मुलाने त्याच्यापेक्षा वयाने इतक्या मोठ्या असलेल्या मुलीसोबत लग्न केल्याने कुटुंबीय हैराण आहेत. हे प्रकरण चाइल्ड लाइनमध्ये गेलं. बाल कल्याण समितीने घटनेचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर मुलीविरोधात कारवाईसाठी देवरियाच्या एसपींना पत्र लिहिलं.
लाडीगोडी लावून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. मुलगी अंडरग्राऊंड झाल्याच बोललं जातय. मुलगा आपल्या घरात आहे. मुलगी देवरियाच्या सलेमपुर कोतवाली क्षेत्रातील गावची राहणारी आहे. तिच्यामध्ये आणि मुलामध्ये सहा महिन्यापूर्वी अफेअर सुरु झालेलं. मुलाचे कुटुंबीय मुलीवर फसवणूक केल्याचा आरोप करत आहेत. मुलाच म्हणणं आहे, अनेकदा लाडीगोडी लावून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. सोबतच विष प्राशनाची धमकी दिली.
काही पोलीसच मुलीच्या बाजूने बोलू लागले
मागच्या काही काळापासून ती मुलावर लग्नासाठी दबाव टाकत होती. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर काही पोलीसच मुलीच्या बाजूने बोलू लागले. लग्न न केल्यास दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलगा दबावाखाली आला.
मुलीने मुलासोबत सात फेरे घेतले
27 ऑगस्टला भगडा भवानी मंदिरात दोघांनी मिळून लग्न केलं. असं सांगितल जातय की, लग्नाच्यावेळी दोघांचे कुटुंबीय तिथे पोहोचले होते. मुलाचे कुटुंबीय सतत नकार देत होते. मात्र, तरीही मुलीने मुलासोबत सात फेरे घेतले. लग्नानंतर मुलाच्या आईने मुलीला सोबत घरी घेऊन जाण्यास नकार दिला.
मुलगा अजून सज्ञान नाहीय
त्या म्हणाल्या की, मुलगा अजून सज्ञान नाहीय. तो सज्ञान झाल्यानंतर मुलीला घरी घेऊन येईन. त्यावरुन तिथे वाद झाला. या दरम्यान कोणीतरी चाइल्ड लाइनला या बद्दल कळवण्यात आलं. चाइल्ड लाइनची टीम तिथे पोहोचली आणि दोन्ही बाजूंना कोतवाली येथे घेऊन गेले. बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष सावित्री राय यांनी देवरियाच्या एसपींना कारवाईसाठी पत्र लिहिलं. आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
