नवऱ्याच्या नजरेत भरली बायकोची मावशी, पत्नी रडत, रडत बोलली चार वर्षांपासून दोघे रोज आमच्या घरी…
सध्या नात्यामधल्याच अनैतिक संबंधांच्या चक्रावून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. आता एका प्रकरणात नवऱ्याच बायकोच्या मावशी सोबत प्रेम प्रकरण सुरु झालं. महत्त्वाच म्हणजे बायकोला संशयही आला नाही. तिला वाटलं की, मावशी दु:खी आहे.

मागच्या दोन महिन्यांपासून सासू-जावयाच्या अनेक लव्ह स्टोरीज समोर येत आहेत. अलीगढनंतर गोंडामध्ये सुद्धा एका सासू होणाऱ्या जावयासोबत पळून गेली होती. आता याच गोंडामध्ये सासू-जावयाची एक प्रेमकथा समोर आली आहे. एका जावयाच मागच्या चार वर्षांपासून विधवा चुलत सासूसोबत अफेअर सुरु होतं. एक दिवस दोघे पळून गेले. पत्नी आता तीन मुलांना घेऊन एसपीकडे न्याय मागत आहे. नवाबगंज भागातील हे प्रकरण आहे. पत्नीने पती आणि विधवा चुलत सासू विरोधात FIR नोंदवला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार तिचा पती विधवा चुलत सासूसोबत पळून गेला. महिलेने SP ला सांगितलं की, “साहेब माझं माहेर धानेपूरमध्ये आहे. माझा निकाह मुस्लिम रिती रिवाजाने एक नोव्हेंबर 2017 रोजी बहराइचच्या नवाबगंज येथील इरफान सोबत झाला”
पीडितेनुसार, लग्नानंतर आम्हाला एक मुलगा आणि दोन मुली झाल्या. महिलेचा आरोप आहे की, पती इरफान तिच्या मावशीसह फरार झाला. नात्याने ती इरफानची मावशी सासू लागते. न्यायासाठी ती गोंडा ते लखनऊपर्यंत पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवत आहे. पीडितेने सांगितलं की, निकाहानंतर काही काळाने रोजगाराच्या शोधात ती पतीसोबत लखनऊला आली. तिथे भाड्याच्या घरात ते राहू लागले. ती घरी राहून संसार संभाळत होती. पती इरफान कुटुंबाच्या पालनपोषणासाठी ऑटोरिक्षा चालवायचा.
सुरुवातीला मला वाटलं मावशी दु:खी आहे
महिलेने सांगितलं की, तिची सख्खी मावशी गोंडा खरगपूरमध्ये राहते. वर्ष 2018 साली मावशीच्या नवऱ्याच आकस्मिक निधन झालं. त्यानंतर मावशीच लखनऊला आमच्या घरी येण-जाणं वाढलं. सुरुवातीला मला असं वाटलं की, मावशी नवऱ्याच्या अचानक निघून जाण्यामुळे दु:खी आहे. एकटी पडली आहे. म्हणून मन शांतीसाठी कदाचित आमच्या घरी येत असेल. या दरम्यान मावशीच आणि माझ्या पतीच अफेअर सुरु झालं.
तिला नवऱ्याच्या आणि तिच्या मावशीच्या प्रेमसंबंधांबद्दल कधी समजलं?
आरोप आहे की, दोघांमध्ये मागच्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. सहा महिन्यापूर्वी तिला हे समजल्यानंतर तिने विरोध केला. त्यावेळी पती मावशी सासूला घेऊन फरार झाला. तिने लखनऊच्या ठाकूरगंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. खरगपूर आणि धानेपूर येथे सुद्धा तक्रार नोंदवली. पण काही कारवाई झाली नाही. आता तिने एसपी कार्यालय गाठून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.