नवीन नवरी बोलली रक्षा बंधनासाठी घरी जायचय, तिथे जाऊन जे कांड केलं, त्यामुळे माहेरचे शॉकमध्ये
सासरच्यांनी सुद्धा फार चौकशी न करता तिला परवानगी दिली. पण त्यांना हे माहित नव्हतं की, आपली सूनबाई काय कांड करणार आहे?. माहेरचे लोक सासरच्यांना ही माहिती द्यायला घाबरत आहेत.

माहेरी आलेली नवीन नवरी अचानक गायब झाली. ही बातमी पसरताच सगळेच हडबडले. रक्षाबंधनासाठी माहेरी जायचय असं सासरी सांगून ती निघालेली. सासरच्यांनी सुद्धा फार चौकशी न करता तिला परवानगी दिली. पण त्यांना हे माहित नव्हतं की, आपली सूनबाई काय कांड करणार आहे?. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील हे प्रकरण आहे. बिल्हौर भागातील हे प्रकरण आहे. युवती बेपत्ता झाल्यानंतर घरच्यांनी तिचा भरपूर शोध घेतला. पण तिच्याबद्दल काही माहिती मिळाली नाही.
मग, ती तिच्या पूर्व प्रियकरासोबत पळून तर गेली नाही ना, असा संशय आला. नंतर समजलं की, तिचा बॉयफ्रेंड सुद्धा गायब आहे. त्यावेळी सर्वांचा संशय खात्रीमध्ये बदलला की, ती तिच्या प्रियकरासोबतच पळून गेलीय. युवतीच्या वडिलांच म्हणणं आहे की, तो मुलगा मुलीला धमकावून त्याच्यासोबत घेऊन गेला. कारण मुलगा लग्नासाठी तिच्या मागे लागलेला.
तेव्हापासून मुलगी गायब
पोलिसांनी घरच्यांच्या सांगण्यावरुन तक्रार नोंदवून घेतलीय. युवतीचा शोध सुरु आहे. बेपत्ता असलेल्या युवतीच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं की, आमच्या घराच्या जवळ गल्लीमध्ये एक युवक राहतो. तो आमच्या मुलीच्या मागे लागलेला. सतत मुलीला त्रास द्यायचा. नंतर आम्ही आमच्या मुलीच दुसरीकडे लग्न लावून दिलं. 23 जुलै रोजी घरातले सदस्य काही कामानिमित्त बाहेर गेले होते, तेव्हापासून मुलगी गायब आहे.
माहेरच्यांचा स्पष्ट आरोप काय?
लग्नाआधी युवक अनेकदा मुलीसोबत दिसला होता. त्यावर मुलीने आपल्या घरी सांगितलेलं की, युवक बाहेर तिला त्रास देतो. तो मुलगा पुन्हा तिला धमकावून सोबत घेऊन गेलाय असं माहेरच्यांचा स्पष्ट आरोप आहे. मुलगी गायब झाल्यापासून कुटुंबियांची वाईट हालत आहे. माहेरचे लोक सासरच्यांना ही माहिती द्यायला घाबरत आहेत. मुलीला संसार मोडेल म्हणून ते असं करत होते.
पोलीस तपासातून काय समोर आलय?
मुलगी माहेरी आलेली तेव्हापासून युवक भेटण्यासाठी तिच्यामागे लागलेला असं कुटुंबियांनी सांगितलं. ही गोष्ट मुलीने आपल्या आईला सांगितली. मुलीने मला फोनवरुन सांगितलं की, तो मुलगा जबरदस्ती तिला कुठेतरी घेऊन गेला आहे असं आईच म्हणणं आहे. लग्नाआधी युवकाचे युवतीसोबत चांगले संबंध होते. दोघांच प्रेम प्रकरण होतं, असं आतापर्यंतच्या पोलीस तपासातून समोर आलय. गावात प्रत्येकाला ही गोष्ट माहित होती. पण युवतीच्या घरच्यांना तो पसंत नव्हता.
