Karva Chauth 2024 : करवा चौथला नवरा घरी नव्हता, पत्नीने बॉयफ्रेंडसोबत लग्न करुन मोडलं व्रत
Karva Chauth 2024 : करवा चौथला बायका नवऱ्यासाठी व्रत ठेवतात. उपवास करतात. चंद्राला पाहून व्रत तोडतात. पण इथे उलटच घडलं. एका विवाहित महिलेने नवरा घरी नाही, म्हणून प्रियकरासोबत लग्न केलं.
20 ऑक्टोबरला देशभरात करवा चौथचा सण साजरा करण्यात आला. विवाहित महिलांनी पतीसाठी करवा चौथच व्रत ठेवलं होतं. उत्तर प्रदेशच्या मऊमध्ये तर एका महिलेने हद्दच केली. नवरा असताना तिने प्रियकरासोबत लग्न केलं. पती त्यावेळी घरी उपस्थित नव्हता. लोकांनी या लग्नाचे व्हिडिओ बनवून व्हायरल केले. कोपागंज क्षेत्रातील हे प्रकरण आहे. गौरीशंकर मंदिरात या जोडप्याने करवा चौथच्या दिवशी लग्न केलं. विशेष म्हणजे महिला आधीपासून विवाहित आहे. मात्र, तरीही तिने बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं. नवऱ्याला या बद्दल समजताच तो लगेच घरी आला. त्याने पत्नीला असं पाऊल उचलण्यामागचा जाब विचारला. दोघांमध्ये भांडण सुरु झालं. वाद वाढल्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलवून घेतलं.
पत्नी प्रियकरासोबत पोलीस ठाण्यात आली. पण पती आला नाही. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. माहितीनुसार, प्रमिला नावाच्या युवतीच भीटी मोहल्ला येथे राहणाऱ्या आकाश सोबत लग्न झालं होतं. पण प्रमिलाचा आधीपासून प्रियकर होता. त्याचं नाव विजय शंकर आहे. विजय सभा लैरो गावचा राहणारा आहे. लग्नानंतरही प्रमिला आणि विजयच अफेयर सुरु होतं.
घरात कोणी नव्हतं, तेव्हा….
दहा दिवसांपूर्वी प्रमिलाने आकाशला सोडून विजय शंकरसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. ती त्याच्यासोबत पळून गेलेली. दोन्ही कुटुंबात बोलणी झाल्यानंतर प्रमिला पुन्हा नवऱ्याच्या घरी आली. याच दरम्यान आकाश काही कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यानंतर 20 ऑक्टोंबरला करवा चौथ होतं. घरात कोणी नव्हतं. प्रमिलाने संधी साधून विजयसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला.
….पण आकाश पोलीस ठाण्यात गेला नाही
प्रमिला आणि विजयने रविवारी गौरीशंकर मंदिरात लग्न केलं. या दरम्यान तिथे अनेक लोक गोळा झालेले. या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ बनवला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला. आकाशला या बद्दल समजल्यानंतर तो रात्री पोलिसांना घेऊन प्रमिलाच्या घरी पोहोचला. दोन्ही बाजूंमध्ये वादावादी झाल्यानंतर दोघांना पोलीस ठाण्यात बोलावलं. पण आकाश पोलीस ठाण्यात गेला नाही. सध्या पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत.