AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सजून धजून ‘ती’ वरातीची वाट बघत होती, पण नवरा तर बहिणीसोबत फरार

घरात लग्नाचं वातावरण होतं, हळद, मेंहदी सगळं पार पडलं. रंगलेल्या मेंदीच्या हाताने वधू, अधीर मनाने लग्नाची आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याची वाट बघत. लग्नाला अवघा एक दिवस उरला होता आणि तितक्यात घरी एक फोन आला, जे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

सजून धजून 'ती' वरातीची वाट बघत होती, पण नवरा तर बहिणीसोबत फरार
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Dec 01, 2023 | 2:55 PM
Share

बरेली | 1 डिसेंबर 2023 : घरात लग्नाचं वातावरण होतं, हळद, मेंहदी सगळं पार पडलं. रंगलेल्या मेंदीच्या हाताने वधू, अधीर मनाने लग्नाची आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याची वाट बघत. लग्नाला अवघा एक दिवस उरला होता आणि तितक्यात घरी एक फोन आला, जे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्नाच्या एक दिवस होणारा नवरा मुलगा त्याच्या आत्तेबहिणीसोबत पळू गेला. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात हा विचित्र प्रकार घडला.

वधूच्या कुटुंबियांना हा प्रकार समजताच त्यांच्या डोक्यात संतापाची तिडीकच गेली. संतापाच्या भरातच ते वराच्या घरी पोहोचले आणि एकच गोंधळ माजला. त्यानंतर गावात पंचायत बोलवून अखेर दीड लाख रुपयांवर तोडगा काढण्यात आला. सध्या पोलिसांनी पळून गेलेला तरुण आणि तरुणीला ताब्यात घेतले असून अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपींविरुद्ध चालान जारी केले आहे.

हे संपूर्ण प्रकरण भोजीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. तेथील गावातील एक व्यक्तीने आरोप केला काही त्याच्या बहिणीचे लग्न शिशगढ पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील तरुणासोबत ठरले होते. लग्न अवघे एका दिवसावर आले होते, दुसऱ्या दिवशी घरी वरात येणार होती. पण लग्नाच्या एक दिवसाआधीच होणारा नवरा त्याच्या आत्याच्या मुलीसोबत पळून गेला. ती त्याच्याच गावात राहणारी होती.

मुलीच्या कुटुंबीयांनी केली होती लग्नाची खरेदी

जिचं लग्न ठरलं होतं, त्या वधूच्या घरच्यांनी त्यांच्या होणाऱ्या जावयाच्या घरी आधीच काही पैसे आणि बाईक दिली होती. लग्नाची सगळी खरेदीही झाली. सगळी तयारी पूर्ण होती. नातेवाईकांसाठी जेवणाची व्यवस्था, मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पण लग्नापूर्वीच होणारा नवरा दुसऱ्या मुलीसोबत पळाल्याने सगळेच संतापले. चिडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाचे घर गाठून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

पंचायतीन काढला तोडगा

अखेर या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी गावात पंचायत बोलावण्यात आली. मुलीच्या बाजूचे जे पैसे खर्च करण्यात आले, त्यांना तो सर्व खर्च परत करण्यात यावा, असा तोडगा पंचायतीमध्ये काढण्यात आला. सध्या पोलिसांनी त्या तरुण व तरुणीला ताब्यात घेतले असून किरकोळ कलमांतर्गत तरुणावर चालान लावले आहे.

पतीसोबत वाद झाल्याने बहीण राहत होती माहेरी

मिळालेल्या माहितीनुसार, नवरा मुलगा ज्या बहिणीसोबत पळून गेला, तिचा आधीच विवाह झाला होता. मात्र पतीसोबत वाद झाल्यानंतर ती माहेरी राहत होती. ती बेपत्ता झाल्यावर तिच्या कुटुंबीयांनी भोजीपुरा पोलिसांत तक्रार केली. अखेर पोलिसांनी त्या दोघांना पकडले.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.