‘भावोजी माझ्याशिवाय राहू शकत नाहीत’, बहिणीच्या तोंडातून हे शब्द ऐकताच दीदीने एका क्षणात संपवला विषय
Jija Sali Love Story : मेहुणी आणि भवोजीमधलं हे नातं खट्याळपणाच, मजा, मस्करी आणि मान-सन्मानाच असतं. पण काही लोक हे नातं कलंकित करतात, लाज आणतात. असाच प्रकार समोर आला आहे.

साली म्हणजे मेहुणीला नेहमी ‘आधी घर वाली’ म्हटलं जातं. मेहुणी आणि भवोजीमधलं हे नातं खट्याळपणाच, मजा, मस्करी आणि मान-सन्मानाच असतं. पण काही लोक हे नातं कलंकित करतात, लाज आणतात. असाच प्रकार उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये घडला. एका मेहुणीच आपल्याच भावोजीसोबत प्रेमसंबंध सुरु होते. दीदी म्हणजे बहिणीला या बद्दल समजल्यानंतर मोठा हाय वोल्टेज ड्रामा झाला. तिनेच नंतर छोट्या बहिणीचा हात आपल्या पतीच्या हातात सोपवला व स्वत: माहेरी निघून आली. मुलगी अचानक माहेरी निघून आल्यानंतर नातेवाईकांनी तिला कारण विचारलं. जेव्हा त्याना सत्य समजलं, तेव्हा सर्वजण पोलीस ठाण्यात पोहोचले. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंमध्ये तडजोड घडवून आणण्याचे प्रयत्न सुरु होते. अजीमगर पोलीस ठाणे क्षेत्रातील प्रकरण आहे. मुरसैना येथे राहणाऱ्या युवकाचा वर्षभरापूर्वी खौद येथे राहणाऱ्या युवतीसोबत लग्न झालं होतं.
लग्नाच्या काही दिवसानंतर युवकाच मेहुणीसोबत अफेअर सुरु झालं. हळूहळू हे प्रेमसंबंध बहरत गेले. पण नातेवाईकांना याचा जरासाही अंदाज आला नाही. पण असं म्हणतात प्रेम कधी लपून राहत नाही. दोन दिवसांपूर्वीच पत्नीने तिच्या छोट्या बहिणीला पतीसोबत नको त्या अवस्थेत पकडलं. ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
तिला घेऊन नवऱ्याकडे आली
पत्नीने या बद्दल तिच्या छोट्या बहिणीला जाब विचारला. त्यावर ती म्हणाली की, ‘माझं भावोजींवर भरपूर प्रेम आहे. भावोजी माझ्याशिवाय राहू शकत नाहीत’ आपल्याच पतीसोबत बहिणीचे प्रेमसंबंध हे ऐकून पत्नीचा पारा चढला. काही तास घरात जोरदार भांडण सुरु होतं. त्यानंतर तिने छोट्या बहिणीचा हात पकडला व तिला घेऊन नवऱ्याकडे आली. नवऱ्याच हातात स्वत:च्या बहिणीचा हात देऊन बोलली, ‘जा जगून घे आपलं आयुष्य’. त्यानंतर पत्नी माहेरी निघून आली.
‘भावोजींशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही’
माहेरच्यांना मुलीने सगळा प्रकार सांगितल्यानंतर ते हडबडले. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सर्व प्रकार सांगितला. पोलीसही ऐकून सून्न झाले. पोलीस त्यांच्या गावात गेले, त्यावेळी आरोपी संपूर्ण कुटुंबासोबत गायब झालेला. मेहुणी पोलिसांना म्हणाली की, “माझी वयाची 18 वर्ष पूर्ण आहेत. मी स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकते. भावोजींवर माझं प्रेम आहे. भावोजींशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही”
पोलिसांची भूमिका काय?
सध्या भावोजी मेहुणीच हे प्रेम प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय ठरलं आहे. पोलीस अधिकारी कर्म सिंह म्हणाले की, “भावोजी मेहुणीच हे प्रेम प्रकरण चर्चेत आलं आहे. दोन्ही बाजू यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत”
