7 दिवस, 7 मुलं आणि एक मुलगी…मुस्लिम बॉयफ्रेंड साजिदने असा केला विश्वासघात
साजिदवर तिचा विश्वास होता. त्याच्यावर ती प्रेम करायची. 29 मार्चला बॉयफ्रेंड साजिदने तिला भेटायला बोलावलं. त्यानंतर पुढच्या सात दिवसात आपल्या आयुष्यात काय घडणार? आयुष्य कसं बदलून जाणार? याची तिला जराही कल्पना नव्हती. चार एप्रिलच्या संध्याकाळी पोलिसांनी युवतीला शोधून काढलं.

एका युवतीसोबत सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. युवतीच्या नातेवाईकांनी सांगितलं की, 29 मार्चला पीडित मुलीला तिचा बॉयफ्रेंड मलदहिया येथील हुक्का बारमध्ये घेऊन गेला होता. तिथे त्याचे साथीदार होते. त्यातील दोघांना पीडित मुलगी ओळखत होती. अन्य साथीदारांना ती ओळखत नव्हती. हुक्का बारमध्ये त्यांनी पीडित मुलीच्या पेयामध्ये नशेचा पदार्थ मिसळला. त्यानंतर त्यांनी युवतीवर अत्याचार केला. सात दिवस आरोपींनी हुक्का बारपासून वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन मुलीवर बलात्कार केला. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.
लालपुर-पाण्डेय पोलीस ठाणे क्षेत्रात राहणारी युवती 29 मार्चपासून बेपत्ता होती. कुटुंबियांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. चार एप्रिलच्या संध्याकाळी पोलिसांनी युवतीला शोधून काढलं. उत्तर प्रदेशच्या वारणसीमधील हे प्रकरण आहे.
पुढचे सात दिवस त्याने विश्वासघात केला
युवती बीपीएडमध्ये प्रवेशाची तयारी करत होती. कॉलेजमध्ये ती रनिंग प्रॅक्टिससाठी जायची. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, इन्स्टाग्रामवर तिची साजिद नावाच्या युवकासोबत मैत्री झाली. युवकाने तिची अन्य मित्रांसोबत ओळख करुन दिली. 29 मार्चाल बॉयफ्रेंड साजिदने तिला भेटायला बोलावलं. त्यानंतर पुढचे सात दिवस त्याने विश्वासघात केला. तरुणीवर सात दिवस सामूहिक अत्याचार सुरु होता.
आरोपींमध्ये दुसऱ्या समुदायाचे युवक
काही आरोपींना अटक झाली आहे. अन्य आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांच्या तीन टीम्सकडून छापेमारीची कारवाई सुरु आहे. जिथे हे कांड घडलं, त्या हुक्का बार आणि हॉटेलवरही पोलिसांनी छापा मारला. आरोपींमध्ये दुसऱ्या समुदायाचे युवक आहेत. त्यामुळे पोलीस खूप संवेदनशीलतेने हे प्रकरण हाताळत आहेत.
पोलीस कमिश्नरने काय आदेश दिला?
नातेवाईकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी 6 एप्रिलला गुन्हा दाखल केला. युवतीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये हुक्का बारशी संबंधित एक व्यक्ती आहे. वाराणसीच्या पोलीस कमिश्नरने या प्रकरणातील सर्व हॉटेल्स आणि हुक्का बारवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
