नवरा झोपताच नवरी सुरु झाली, तिचे कृत्य पाहून तो पाहातच बसला; मधुचंद्राच्या रात्रीचा Video Viral
सोशल मीडियावर एका नवविवाहित जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नवरा झोपताच नवरीने जे कृत्य केले ते पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.

सोशल मीडियावर लग्नाचे आणि लग्नानंतरचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मग ते लग्नाचे विधी असोत, नवरा-नवरीचा नाच असो किंवा कुटुंबीयांचे मजेशीर क्षण असोत. पण आता तर लोकांनी लग्नाच्या पहिल्या रात्रीचेही व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ स्वतः नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा-नवरी फुलांनी सजवलेल्या बेडवर असलेल्या खोलीत होते. व्हिडीओत नवरदेव झोपलेला आहे, तर नवरी त्याच्या शेजारी बसली आहे. पण ती असे काही करते की, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नवरी नेमके काय करते? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
वाचा: जे घडतय ते शांतपणे पाहात रहा; घर मालकाशी पत्नीचे संबंध, पतीला कळताच… थरकाप उडवणारी घटना
View this post on Instagram
व्हिडीओत काय आहे?
व्हिडीओत फुलांनी सजवलेला बेड दिसत आहे. त्यावर नवरदेव झोपलेला आहे, ज्याचे फक्त पाय दिसत आहेत. त्याच्या बाजूला नवरी बसली आहे. तिने डोक्यावरील घुंघट घेतलेला आहे. तिने लग्नात घातलेले दागिने काढलेले नाहीत आणि ती नवरदेवाचे पाय दाबत आहे. हा व्हिडीओ अर्शद खान याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “माझी पत्नी,” ज्यावरून हा व्हिडीओ त्याचाच आहे हे स्पष्ट होते.
सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी कौतुक करत म्हटले, “देव सर्वांना अशी काळजी घेणारी पत्नी देवो.” तर काहींनी अर्शदवर टीका करत म्हटले, “लाज नाही वाटली? लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला कामाला लावले!” एका युझरने तर लिहिले, “आधी त्याने तिचे पाय दाबले असतील, मग ती दाबू लागली तेव्हा हा व्हिडीओ बनवला.” एका युझरने मजेशीर टिप्पणी केली, “आता कळलं, मुलगी पाठवणीच्या वेळी इतकी का रडते!” सोशल मीडियावर या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
