लग्नाच्या आधी नवरीची डेंजर अट, मैत्रिणींना आधी बसला धक्का नंतर लाजून…

एक तरुणीने तिच्या लग्नासाठी अजब अट ठेवली आहे. तिने तिच्या मैत्रिणींना लग्नाचे निमंत्रण देताना "नटून-थटून" येऊ नये अशी अट घातली आहे. तिच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. हा किस्सा रेडिटवर शेअर झाल्यावर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लग्नाच्या आधी नवरीची डेंजर अट, मैत्रिणींना आधी बसला धक्का नंतर लाजून...
Marriage
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 17, 2025 | 7:25 PM

आपल्याला लग्नाचं आमंत्रण आल्यावर लगेच घरामध्ये लग्नाची तयारी सुरू होते. मग ते नातेवाईकाचं लग्न असो, मित्र परिवारातील कुणाचं असो, शेजाऱ्याचं असो की वस्तीतील किंवा सोसायटीतील कुणाचंही लग्न असो. या सोहळ्यात सामील होण्यासाठी प्रत्येकाची आधीपासूनच तयारी सुरू होते. त्यातल्या त्यात अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या लग्नाची पत्रिका आली तर लग्नाची तयारी अधिकच जोरात सुरू होते. लग्नात आपल्याकडेच सर्वांचं लक्ष राहावं, अशा पद्धतीने नटण्याचा आपण प्लान करत असतो. पण सध्या एक घटना समोर आली आहे. ही घटना वाचल्यावर तुम्हालाही धक्काच बसेल. अशा पद्धतीने लग्नाचं आमंत्रण कोणी देऊच कसं शकतं? असं तुम्हाला वाटू लागेल.

जेव्हा कधी ओळखीच्या किंवा नात्यातील व्यक्तीचं लग्न असतं किंवा आपल्या मित्राचं मैत्रीणीचं लग्न असतं तेव्हा आपण लग्नात हायफाय बनून जाण्याची तयारी करतो. पण एक वेगळीच घटना समोर आली आहे. एका तरुणीचं लग्न होतं. तिने आपल्या मैत्रिणींना लग्नाची पत्रिका दिली. पण लग्नात नटून थटून येण्याची गरज नाही, अशी अटच तिने मैत्रिणींना घातली. त्यामुळे तिच्या मैत्रिणींची चांगलीच पंचाईत झाली. हा किस्सा ऐकल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. प्रत्येकजण ऐकून हैराण झाला. लग्नात अशा पद्धतीने कोणी कुणाला बोलावतं का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

वाचा: मामीच्या बहिणीवर जीव जडला, मामामध्येच नडला; त्यानंतर जे घडलं त्याने…

काय ठेवल्या अटी

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, 27 वर्षाच्या एका तरुणीने तिच्या लग्नात मुलींना बॅन केलंय. ज्या मुलींचे फोटो अत्यंत सुंदर येतात त्या मुलींना तिने बॅन केलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मुलीने तिच्या मित्र आणि मैत्रिणींना निमंत्रण देताना एक अट ठेवली होती. कुणीच लग्नात नटूनथटून यायचं नाही. त्यामुळे लग्नाला जायचं कसं हा प्रश्न मुलींना पडला. विदाऊट मेकअपमध्ये जाण्याच्या कल्पनेनेच त्या लाजल्या. ही माहिती जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा यूजर्स कमेंट करू लागले. या लग्नाला जायचं म्हणजे स्वात:ची इज्जत काढून घेण्यासारखं आहे, अशी कमेंट लोकांनी केलीय.

ही गोष्ट नवरीच्या जवळच्या मैत्रिणीने रेडिटवर शेअर केली आहे. माझ्या मैत्रीणीच्या लग्नाचं आमंत्रण मला आलं. लग्नपत्रिका पाहून मी खूप आनंदीत झाले. पण लग्नात येण्याची अट जेव्हा मी वाचली तेव्हा मला धक्काच बसला. लग्नाला यायाचं. पण नटून थटून आलेलं चालणार नाही, अशी सूचनात पत्रिकेत लिहिली होती. हे वाचल्यावर मला फारच आश्चर्य वाटलं. मी नवरीशी बोलले. त्यानंतर मला त्याबाबतच्या काही गोष्टी कळल्या. लग्नात आपल्यापेक्षा कोणीच सुंदर दिसू नये. खासकरून फोटोत आपणच सुंदर दिसलं पाहिजे. बाकी कोणी नाही, असं नवरीला वाटत होतं. म्हणूनच तिने ही अट ठेवली, असं नवरीच्या मैत्रिणीने म्हटलंय. ही अजब गोष्ट लोकांमध्ये व्हायरल झाल्यावर प्रत्येकाने त्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे.